महाराष्ट्रात सत्तास्थापनेचे उरले 'हे' 3 पर्याय? असा मिळू शकतो नवा मुख्यमंत्री

महाराष्ट्रात सत्तास्थापनेचे उरले 'हे' 3 पर्याय? असा मिळू शकतो नवा मुख्यमंत्री

राजकीय अस्थिरतेमुळे महाराष्ट्रावर राष्ट्रपती राजवटीचंही सावट आहे. यातच सत्तास्थापनेच्या तीन पर्यायांची चर्चा आहे.

  • Share this:

मुंबई, 10 नोव्हेंबर : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकालानंतर सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या भाजपने बहुमत नसल्याने सत्तास्थापनेस नकार दिला आहे. त्यानंतर आता सत्तेच्या खुर्चीवर नेमकं कोण विराजमान होणार, याची उत्सुकता राज्याला लागली आहे. तसंच राजकीय अस्थिरतेमुळे महाराष्ट्रावर राष्ट्रपती राजवटीचंही सावट आहे. यातच सत्तास्थापनेच्या तीन पर्यायांची चर्चा आहे.

'आम्ही आता सत्ता स्थापन करणार नाही. जनादेशाचा अपमान करून शिवसेनेला काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत सत्ता स्थापन करायची असेल तर त्यांना आमच्या खूप खूप शुभेच्छा,' असं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणाला मोठी कलाटणी मिळाली आहे.

सत्तास्थापनेच्या कोणत्या 3 शक्यता आहेत?

1. भाजपाने सत्ता स्थापन केली नाही त्यामुळे आता राज्यपाल दुसरा मोठा पक्ष म्हणून शिवसेनेला सत्तास्थापनेसाठी बोलावणार का याकडे लक्ष.

2. शिवसेनेऐवजी काँग्रेस-राष्ट्रवादी ही निवडणुकीआधी आघाडी असलेल्याने आणि त्यांची एकत्रित संख्याही जास्त त्यामुळे या आघाडीस बोलावणार का?

3. शिवसेना स्वत: काँग्रेस-राष्ट्रवादी पक्षाचं समर्थनपत्र घेत सत्ता स्थापनेचा दावा करू शकते.

सत्ता स्थापन कोणास बोलावयाचे याचा संपूर्ण अधिकार राज्यपाल महोदय यांचा असतो.

दरम्यान, मुख्यमंत्रिपदावरून झालेल्या संघर्षानंतर शिवसेनेने भाजपसोबत जाण्याचं टाळलं आहे. त्यामुळे बहुमताचा 145 हा जादुई आकडा जुळवता न आल्याने भाजपनेही सत्तास्थापना करण्यास नकार दिला आहे. 'नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला पूर्ण बहुमत देत जनादेश मिळाला. त्यामुळे राज्यपालांनी नव्यानं सत्ता स्थापन करण्यास आम्हाला सांगितले. मात्र असे असले तरी शिवसेना सत्ता स्थापन करण्यासाठी आमच्यासोबत आली नाही. त्यामुळे आम्ही आता सत्ता स्थापन करणार नाही,' अशी मोठी घोषणा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.

राज्यपालांच्या निमंत्रणानंतर भाजपने सत्ता स्थापन करण्यास असमर्थता दर्शवल्यानंतर दुसरा मोठा पक्ष असलेली शिवसेना सत्तेवर दावा करण्याची शक्यता आहे. त्यावर बोलताना चंद्राकांत पाटील म्हणाले की, 'जनादेशाचा अपमान करून सेनेला काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत सत्ता स्थापन करायची असेल तर त्यांना आमच्या खूप खूप शुभेच्छा.'

सध्या शिवसेनेच्या आमदारांना मालाडमध्ये द रिट्रीट हॉटेलमध्ये ठेवण्यात आलं आहे. त्याठिकाणी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, गजानन कीर्तिकर, मिलिंद नार्वेकर, आदेश बांदेकर, अनिल देसाई यांनी काल रात्री उशिरा हॉटेलमध्ये आमदारांची भेट घेतली आहे. तर आज उद्धव ठाकरेही आमदारांची भेट घेण्यासाठी पोहोचले आहेत.

सेना आमदार आणि उद्धव ठाकरे यांची बैठक इथे पार पडणार आहे. एकीकडे काँग्रेस शिवसेनेला बाहेरून पाठिंबा देण्यासाठी तयार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. या अनुषंगाने शिवसेना काँग्रेसचा पाठिंबा घेत भाजपला धक्का देणार का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

VIDEO : राज्यपाल तसा निर्णय घेऊ शकत नाही? पृथ्वीराज चव्हाणांचा मोठा खुलासा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 10, 2019 07:43 PM IST

ताज्या बातम्या