राज्यातील प्रदूषित शहरांची यादी जाहीर, चंद्रपूर पहिल्या क्रमाकांवर तर डोंबिवली अतिप्रदूषित!

राज्यातील प्रदूषित शहरांची यादी जाहीर, चंद्रपूर पहिल्या क्रमाकांवर तर डोंबिवली अतिप्रदूषित!

राज्यात धूळ प्रदूषणात चंद्रपूर प्रथम तर मुंबई विभाग दुसऱ्या क्रमाकांवर आहे. सल्फर डाय ऑक्साईडचे प्रदूषण महाराष्ट्रात कमी असले तरी मुंबई, पुणे आणि चंद्रपूर जिल्ह्यात ते अधिक आहे.

  • Share this:

हैदर शेख, प्रतिनिधी

चंद्रपूर, 19 नोव्हेंबर : महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचा 2018-19 चा प्रदूषण अहवाल जाहीर झाला असून, यात चंद्रपूर आणि मुंबई विभाग सर्वाधिक प्रदूषित असल्याची धक्कादायक बाबसमोर आली आहे.

राज्यात 25 शहरातील एकूण 72 प्रदूषणमापन केंद्राद्वारे 10,164 नमुन्यांच्या अभ्यास करून महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने 2018-19 वर्षातील प्रदूषण अहवाल जाहीर केला आहे. यात बहुतेक सर्वच केंद्रातून धूलीकण प्रदूषण वाढल्याचं म्हटलं आहे. 2017-18 या वर्षाच्या तुलनेत यावर्षीचे 65 टक्के नमुने हे चांगल्या श्रेणीत, तर 35 टक्के नमुने हे धोकादायक श्रेणीत आले आहेत.

या अहवालात चंद्रपूर, सायन, बांद्रा, डोंबिवली ही शहरं अतिप्रदूषित असल्याचं स्पष्ट झाले आहे. मागील आठ वर्षांपासून औरंगाबाद, चंद्रपूर, नागपूर, नाशिक, डोंबिवली, बांद्रा, ऐरोली, पुणे आणि सोलापूर येथे वायू प्रदूषण वाढत असल्याचं निदर्शनास आलं आहे.

या वाढलेल्या प्रदूषणात SO2, NO2, RSPM, Ozone, Benzene, CO या प्रदुषकांचा समावेश आहे. राज्यात धूळ प्रदूषणात चंद्रपूर प्रथम तर मुंबई विभाग दुसऱ्या क्रमाकांवर आहे. सल्फर डाय ऑक्साईडचे प्रदूषण महाराष्ट्रात कमी असले तरी मुंबई, पुणे आणि चंद्रपूर जिल्ह्यात ते अधिक आहे.

प्रदूषण वाढीसाठी वेगवेगळी कारणं आहेत. यात औद्योगिक प्रदूषण, डिझेल, पेट्रोल, गॅस, कोळसा ज्वलन, वाहनांची वाढती संख्या, बांधकामे, वाहतूक, कचरा जाळणे यातून ते वाढीस लागतं.

प्रदूषणामुळे 1.2 मिलियन लोकं मरतात, असा निष्कर्ष ग्लोबल एअर 2019 च्या अहवालात प्रसिद्ध झाला आहे. तर जागतिक आरोग्य संस्था WHO नुसार जागतिक 20 प्रदूषित शहरात भारतात 14 शहरे मोडतात, असं म्हटलं आहे.

प्रदूषणामुळे डोके, गळा, नाक, फुफ्फुसं, श्वसननलिकेत आजार होतात. रोगप्रतिकारकशक्ती कमी होते, मानसिक आजार, जनन क्षमतेवर परिणाम आणि कॅन्सरसारखे आजार होतात.

चंद्रपुरातील वायु प्रदूषण नवे उच्चांक गाठत आहे. जिल्ह्यातील घुग्गुस हे सर्वाधिक प्रदूषित शहर म्हणून गेल्या 3 वर्षांपासून जाहीर होत आहे. त्यानंतर 2)सायन, 3)बांद्रा, 4)डोंबिवली आणि 5)चंद्रपूर शहर ( सिव्हिल लाईन )हे क्षेत्र हे सर्वाधिक प्रदूषित म्हणून 2018- 2019 सालासाठी जाहीर झाले आहेत. हे नवे आकडे चंद्रपूरकरांची चिंता वाढविणारे ठरले आहे.

===============================

Published by: sachin Salve
First published: November 19, 2019, 5:55 PM IST
Tags:

ताज्या बातम्या