मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /काय सांगताय? धानाला देशी दारूचा उतारा; भंडाऱ्यात शेतकऱ्याच्या प्रयोगाने पिक जोमात

काय सांगताय? धानाला देशी दारूचा उतारा; भंडाऱ्यात शेतकऱ्याच्या प्रयोगाने पिक जोमात

धानाला देशी दारूचा उतारा

धानाला देशी दारूचा उतारा

धान पऱ्याला टॉनिक म्हणून भंडारा जिल्ह्यातील शेतकरी देशी दारुची पाण्यासोबत फवारणी करत आहेत.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

नेहाल भुरे, भंडारा

भंडारा, 4 फेब्रुवारी : 'धानाला देशी दारूचा उतारा' हे वाक्य वाचून बुचकाळ्यात पडला का? कारण दारूला उतारा वाचला असेल. मात्र, दारुही कशाचा तरी उतारा असल्याचं पहिल्यांदाच वाचत असाल. मात्र, देशी दारू धान पिकाला पोषक ठरत आहे. भंडारा जिल्ह्यातील शेतकरी आपल्या धान पऱ्याची उत्तम वाढ होण्यासाठी आणि रोग व कीडीपासून बचाव करण्यासाठी धान पऱ्याला टॉनिक म्हणून देशी दारूची पाण्यासह फवारणी करत आहेत. यामुळे धान पिक उत्तम येत असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

हा सर्रास प्रकार भंडारा जिल्ह्यातील लाखनी तालुक्यात पहायला मिळत आहे. विशेषत: जेवनाळा येथील शेतकरी उन्हाळी धान पऱ्याच्या वाढीसाठी देशी दारूची फवारणी करताना दिसत आहे. परिसरात सध्या उन्हाळी धान रोवणीसाठी असलेल्या नर्सरीची देखभाल सुरू आहे. वातावरणातील धुके पडण्याचे प्रमाण वाढल्याने धानाचे पऱ्हे हे पिवळे पडून कीडग्रस्त होत आहे. अशात रामदास गोंदोळे या युवा शेतकऱ्याने शेतात देशी दारूची फवारणी करत धान परे रोग मुक्त केले आहे. यासाठी एका फवारणी पंपात पाण्यासह 90 एमएल दारूचे मिश्रण करून ते फवारणी करीत आहे. यूट्यूब वरुण त्यांनी वीडियो बघून ही शक्कल लावल्याचे ते सांगत आहे.

वाचा - 3 महिन्यांच्या चिमुकलीला लोखंडी सळईचे चटके; अंधश्रद्धेमुळे गेला जीव

धानाला देशी दारूचा उतारा ही माहिती परिसरात पसरताच इतर शेतकरीही गोंदोळे यांच्या शेतात भेटी देत आहे. हे तंत्र समजून आपल्या शेतातही धान पिकावर फवारणी करणार असल्याचे सांगत आहे. एकीकडे खत-बियाने-फवारणी रोग औषधी महाग झाले असताना केवळ 45 रुपयांत काम होत आहे.

कृषीविभागासाठी हा प्रयोग नवा नाही. पण कोणत्याही कृषी विद्यापीठानं पिकांवरील मद्यप्रयोगाला अधिकृत परवानगी दिलेली नाही. पण हा मद्यप्रयोग परिणामकारक असल्याचं कृषीशास्त्रज्ञ सांगतात. दारू दवा असते असं कुणीतरी म्हटलं होतं. हे वाक्य कोण्या तळीरामानं त्याच्या सोईसाठी म्हटलं असावं असं वाटतं होतं. रामदास गोंदोळे या शेतकऱ्याच्या भाताच्या पिकासाठी दारू दवा झालीय असं म्हणता येईल हेही तितकेच खरे.

First published:

Tags: Farmer