दारुबंदी असलेल्या जिल्ह्यातच 83 लाखांची दारु जप्त

दारुबंदी असलेल्या जिल्ह्यातच 83 लाखांची दारु जप्त

एक दोन नव्हे तर चक्क 1200 पेट्या विदेशी दारू असल्याने गाडीत भुसा दाखवून वाहतूक केली जात होती.

  • Share this:

नरेंद्र मते, वर्धा 11 ऑगस्ट : महात्मा गांधींच्या वास्तव्याने पावन झाला असल्यामुळे वर्ध्याला महात्मा गांधींचा जिल्हा म्हणून ओळखलं जातं. त्यामुळेच तिथे दारुबंदीही आहे. मात्र याच जिल्ह्यात अवैध दारुविक्रीचा सुळसुळाट आहे. जिल्ह्यात वाढत्या दारूच्या तक्रारीवरून पालकमंत्री चंद्रशेखर बावणकुळे यांनी झाडाझडती घेतल्यानंतर सक्रिय झालेल्या राज्य उत्पादन शुल्क विभागाने जिल्ह्याच्या इतिहासातील सर्वात मोठा  83 लाखाचा दारुसाठा जप्त केलाय. कारंजा टोलनाक्यावरून संशयित ट्रेलरच्या तपासणी दरम्यान 63 लाखाच्या 1200 पेट्यासह ट्रेलर असा एकूण 83 लाखाचा मुद्देमाल विभागाने जप्त केलाय.

मोटार पंप दुरुस्तीसाठी विहिरीत उतरलेल्या दोन शेतकऱ्यांचा गुदमरून मृत्यू

वर्धा जिल्ह्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाला नागपूरच्या मार्गे दारू जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली होती. यासाठी कारंजा येथील टोलनाक्यावर सापळा रचण्यात आला होता. अधिकाऱ्यांना एका ट्रेलरवर संशय आला.  ट्रेलरमध्ये भुसा असल्याचे सांगण्यात आले. पण यात चाकं दबलेली असल्याने नक्कीच वजनदार काही तरी असल्याच्या  संशयावरून गाडीची तपासणी करण्यात आली. यात उघडपणे भुसा दिसत होता. मात्र काही पोते हटवत पाहणी केली असता यात दारूच्या पेट्या आढळून आल्यात.

VIDEO : 'त्या' बचावामागची खरी कहाणी; 'तो' माणूस 3 दिवस तराफ्यावर होता बसून

एक दोन नव्हे तर चक्क 1200 पेट्या विदेशी दारू असल्याने भुसा दाखवून वाहतूक केली जात होती. यावेळी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाच्या हाती मोठा दारुसाठा  लागला. पण हा दारूचा माल हा हरियाणा एमपी आणि अरुणाचल प्रदेशमध्ये विक्रीसाठी होता. परंतु भुसा असल्याचे दाखवून अमरावतीच्या अलीकडे माल जात असल्याचे उत्पादन शुल्क विभागाच्या चौकशीत दिसून आलं.

नेमका माल कोणाच्या मालकीचा आहे आणि कुठून आला याचा शोध घेण्याचं आव्हान बाकी आहे. यात अटक करण्यात आलेल्या ट्रकचालकाला हा ट्रक नागरपूरपासून काही अंतरावर असणाऱ्या धाब्यावरून पुढे अमरावतीला नेणार होता. यासाठी त्याला पाच हजार रुपये मिळणार होते. वर्ध्याच्या इतिहासातली ही सर्वात मोठी कारवाई असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिलीय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 11, 2019 10:57 PM IST

ताज्या बातम्या