Home /News /maharashtra /

दारू माफियांची गुंडगिरी, कार्यालयात घुसून अधिकाऱ्यांवर प्राणघातक हल्ला

दारू माफियांची गुंडगिरी, कार्यालयात घुसून अधिकाऱ्यांवर प्राणघातक हल्ला

उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांनी काही दिवसांपूर्वी अंबरनाथ परिसरामध्ये अवैध दारू अड्यांवर धडक कारवाई केली होती

कल्याण, 06 ऑक्टोबर : कल्यामध्ये उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांवर दारू माफियांनी प्राणघातक हल्ला केल्याची घटना कल्याणमध्ये घडली आहे. या हल्ल्यात 3 ते 4 अधिकारी गंभीर जखमी झाले आहे. कल्याण येथील उत्पादन शुल्क विभाग कार्यालयात ही घटना घडली आहे. उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांनी काही दिवसांपूर्वी अंबरनाथ परिसरामध्ये अवैध दारू अड्यांवर धडक कारवाई केली होती. गावठी दारू बनवणाऱ्या हातभट्टी उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी उद्धवस्त केल्या होत्या. तसंच मुद्देमाल जप्त केला होता. सुशांत प्रकरणात भाजपच्या आयटी सेलने फेक अकाऊंट काढून केली बदनामी- गृहमंत्री अधिकाऱ्यांच्या या कारवाईचा राग धरून सोमवारी रात्री दारू माफियांनी कार्यालयावर हल्ला चढवला होता. धारदार शस्त्रांनी अधिकाऱ्यांवर हल्ला केला होता. अचानकपणे झालेल्या या हल्ल्यामुळे कार्यालयात गोंधळ उडाला होता. अधिकाऱ्यांच्या डोक्यात आणि हातांवर धारदार शस्त्रांनी वार करण्यात आले. अधिकारी आणि दारू माफियांमध्ये धुमश्चक्री उडाली होती. अधिकाऱ्यांवर हल्ला करून दारू माफिया घटनास्थळावरून पळून गेले. सोयाबीनची कापणी करून घरी चालले होते शेतमजूर, पिकअपचे टायर पंक्चर झाले आणि.... अधिकाऱ्यांनी तात्काळ या घटनेची माहिती पोलिसांना दिली. कल्याण पोलिसांनी उत्पादन शुल्क विभाग कार्यालयात धाव घेतली. त्यावेळी 3 ते 4 अधिकारी हे रक्तबंबाळ झाल्याचे आढळून आले. सर्व अधिकाऱ्यांना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला असून गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी फरार दारू माफियांचा शोध सुरू आहे.
Published by:sachin Salve
First published:

पुढील बातम्या