"न रहेगी बाँस, न बजेगी बाँसुरी",हायवे दारुबंदीवर जळगाव पालिकेची नामी शक्कल

जर राष्ट्रीय महामार्गच नसेल तर दारू विक्रीचा मार्ग मोकळा होईल. ही कायदेशीर बाब हाती बाळगून जळगाव महापालिकेनं राष्ट्रीय महामार्गाचा दर्जाच

  • Share this:

01 एप्रिल : राष्ट्रीय महामार्गालगत दारू विक्री करण्यावर सर्वोच्च न्यायालयाने बंदी घातली आहे. मात्र, "न रहेगी बाँस, न बजेगी बाँसुरी" या म्हणी प्रमाणे  जर राष्ट्रीय महामार्गच नसेल तर दारू विक्रीचा मार्ग मोकळा होईल. ही कायदेशीर बाब हाती बाळगून जळगाव महापालिकेनं राष्ट्रीय महामार्गाचा दर्जाच काढून टाकण्यासाठी अर्ज केलाय.

आपल्या महापालिका हद्दीतून जाणारा राष्ट्रीय महामार्ग महापालिकेकडे वर्ग करण्याची मागणी राज्य सरकारकडे केलीये. जर रस्त्याची देखभाल करण्याचा खर्च पालिका उचलत असेल तर या अटीवर राज्य सरकार संबंधित राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा रद्द करू शकते. जळगाव महापालिकेने सार्वजनिक बांधकाम विभागाकडे यासाठी अर्ज केला आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागाने नियमानुसार जळगाव शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा रद्द करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. इतर महापालिकांचा प्रस्ताव आल्यास सरकार याचप्रमाणे निर्णय आहे, पण रस्त्याची देखभालाची खर्च महापालिकांना करावा लागणार आहे.

दारूविक्रीतून मिळणारा महसूल वाचवण्यासाठी जळगावप्रमाणे इतर महापालिका ही शक्कल लढवण्याची शक्यता आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 1, 2017 01:37 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading