• Home
  • »
  • News
  • »
  • maharashtra
  • »
  • एमपीएससीचे खाते 'आधार'शी लिंक करा अन्यथा खाते रद्द होईल!

एमपीएससीचे खाते 'आधार'शी लिंक करा अन्यथा खाते रद्द होईल!

महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेसाठी उमेदवारांना ओळख पटवण्यासाठी आधार कार्ड सक्तीचे करण्यात आलाय.

  • Share this:
मुंबई, 07 मे : जर तुम्ही महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेसाठी बसला असाल तर तुम्हाला आधार कार्डची सक्ती लागू होणार आहे. जर तुम्ही हे केलं नाहीतर तुमचे खाते रद्द होईल असं परिपत्रकच आयोगाने जाहीर केलंय. महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेसाठी उमेदवारांना ओळख पटवण्यासाठी आधार कार्ड सक्तीचे करण्यात आलाय. याबाबत परिपत्रक आयोगाने जाहीर केलाय. 1 जून 2018 पासून जर आधार लिंक नसेल तर आयोगाचे जे खाते असेल ते रद्द करण्यात येईल असं आयोगानं स्पष्ट केलाय. आयोगाने आधार कार्डसोबत खाते जोडण्यासाठी मार्च 2017 पासून सुविधा देण्यात आली. 2016 मध्ये आयोगाने याबद्दल घोषणाही केली होती. पण ओळख पटवण्यासाठी गैरप्रकार रोखण्यासाठी आयोगाने हा निर्णय घेतला. 31 मे 2018 पर्यंत आधार कार्ड खात्यासोबत जोडावे लागणार आहे. जर खाते आधार कार्डसोबत जोडले नाहीतर खाते बंद होईल. त्यानंतर तुम्हाला तुमचे खाते पाहता येईल पण तुम्हाला कोणत्याही परिक्षेसाठी बसता येणार नाही असं आयोगाने स्पष्ट केलं. विशेष म्हणजे, सर्वोच न्यायालयात सरकारने आधार सक्तीचं करणार नाही असं सांगितलं असलं तरी त्याचं उल्लंघन आयोग करताना दिसतंय.   आयोगाचे परिपत्रक
First published: