मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

लिंगायत धर्माचे धर्मगुरू शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर लिंगैक्य

लिंगायत धर्माचे धर्मगुरू शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर लिंगैक्य

गेल्या चार दिवसांपासून शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर यांच्यावर उपचार सुरू होते.

गेल्या चार दिवसांपासून शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर यांच्यावर उपचार सुरू होते.

गेल्या चार दिवसांपासून शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर यांच्यावर उपचार सुरू होते.

मुजीब शेख, नांदेड, 1 सप्टेंबर : लिंगायत धर्माचे धर्मगुरू शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर लिंगैक्य ( निधन ) झाले आहेत. नांदेड येथील नारायणा हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान त्यांनी अंतिम श्वास घेतला. गेल्या चार दिवसांपासून शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र उपचारादरम्यानच 104 व्या वर्षी त्यांचं निधन झालं. गेल्या चार दिवसांपासून महाराजांवर नांदेडमध्ये उपचार सुरू होते. मात्र न्यूमोनिया असल्याने त्यांच्या प्रकृतीने उपचाराला प्रतिसाद दिला नाही. अहमदपूरकर अप्पांचे देशभरात लाखो भाविक होते. त्यांच्या जाण्याने लिंगायत समाजात शोककळा पसरली आहे. डॉक्टर व्यंकटेश काब्दे यांनी महाराजांच्या निधनाची अधिकृत माहिती दिली आहे. काही दिवसांपूर्वी पसरली होती अफवा डॉ शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपुरकर यांच्या संजीवन समाधीच्या चर्चेने लातूर जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून बरंच वादगं निर्माण झालं होतं . शिवलिंग शिवाचार्य महाराज जिवंत समाधी घेणार असल्याची अफवा पसरल्याने हजारो भाविकांची गर्दी देखील अहमदपूरच्या भक्ती स्थळावर झाली. अहमदपूर येथील डॉ शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर यांच्या भक्तिस्थळ या ठिकाणी जवळपास 10 हजार लोक जमले होते. गर्दीत एकच चर्चा सुरु होती ती महाराजच्या संजीवन समाधिची. मात्र पोलिसांनी आणि आश्रम प्रशासनानं वाढती गर्दी लक्षात घेवून ती फक्त अफवा होती हे जाहीर केले आणि महाराजांच्या भक्तांनी सुटकेचा श्वास घेतला. त्यांनंतर महाराजांना उपचारासाठी नांदेड येथे हलविण्यात आले होते. या सर्व गोंधळात अहमदपूरकर महाराजांना भेटण्यासाठी अनेक महाराज आले होते. त्याचवेळी अहमदपूरकर महाराजांनी त्यांच्या हाड़ोळती आणि अहमदपूर मठाचे उत्तराधिकारी नेमून त्याची नावे जाहीर केली. यात हाडोळती मठाचे उत्तराधिकारी राजकुमार स्वामी आणि अहमदपूर मठासाठी राजेश्वर स्वामी यांची नियुक्त केली होती.
Published by:Akshay Shitole
First published:

Tags: Nanded

पुढील बातम्या