Home /News /maharashtra /

चिमण्यांचा किलबिलाट; 15 वर्षांपासून 'या' ठिकाणी घरातच भरते चिमण्यांची शाळा...

चिमण्यांचा किलबिलाट; 15 वर्षांपासून 'या' ठिकाणी घरातच भरते चिमण्यांची शाळा...

title=

अनेक लोक पक्षी पाळतात पण त्या पक्षांना बंदिस्त जीवन जगावं लागत...त्या पक्षांना मोकळा श्वास घेता येत नाही...म्हणून प्रत्येक माणसाने जर कल्ले यांच्या सारखं पक्षाचं संगोपन केलं तर पशुपक्षी वाचतील प्रत्येकाला त्यांचा सुमधुर आवाज ऐकायला मिळेल...सकाळी पक्षांचा किलबिलाट

पुढे वाचा ...
  अकोला, 21 मे : चिमण्यांचा किलबिलाट, चिमण्यांचे थवे, पक्ष्याचे स्वर (Birds Sound) आपल्या कानाला हवा असणारा नाद कुठेतरी आता हरवला आहे. पक्ष्यांचे प्रमाण अनेक कारणांमुळे कमी झाल्याचे दिसत आहे. या पक्ष्यांच्या नादापासून आजची पिढी ही दूर होत चालली आहे. पक्ष्यांचे संगोपन (Birds Rearing) कसे करावे, यासाठी आजची पिढी ही विचारच करत नाही, असे एक चित्र आहे. मात्र, या सर्व परिस्थितीत पक्ष्यांच्या संगोपनासाठी कल्ले या दाम्पत्याने विचार केला आणि मागील तब्बल 15 वर्षांपासून सुनील कल्ले आणि सुनीता कल्ले  नैसर्गिकरित्या चिमण्यांचं संगोपन करत आहेत. पक्ष्यांच्या संगोपनासाठी काय करायचं ठरवले - सुनील कल्ले आणि सुनीता कल्ले या दाम्पत्याच्या घराच्या समोर एक पडिक जागा होती. त्या जागेत त्यांनी एक छोटासे गार्डन तयार केले. तसेच त्यामध्ये फळांची झाडे लावली. त्यांनी चिमण्यांसाठी घरटे तयार करत त्यांच्यासाठी नैसर्गिक वातावरण निर्माण केलं. रोज सकाळी त्यांच्या घरात आणि छोट्याशा गार्डनमध्ये हजारो पशुपक्षी येतात. पक्ष्यांची जणू शाळाच (Birds School Akola) इथे भरते. त्यांच्या चिवचिवाटाने कल्ले दाम्पत्याची सकाळ होते. त्यांना रोज वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी पाहायला मिळतात. याठिकाणी ते पक्ष्यांना खायला तांदूळ, बाजरी आणि भांदली सुद्धा टाकतात. अकोला शहरातील कौलखेड भागात त्यांनी हा उपक्रम मागील 15 वर्षांपासून सुरू केला आहे. हेही वाचा - Spinach Side Effects: आरोग्यदायी आहे म्हणून जास्त पालक खाऊ नका; त्याचे दुष्परिणाम एकदा जाणून घ्या
  कल्ले दाम्पत्याला याचा आनंद - 
  आजकाल चिमण्या, पशुपक्षी लुप्त होत चालले आहेत. मात्र, कल्ले यांच्या घरासमोर हजारो पक्षी येतात. याचाच आनंद कल्ले दाम्पत्याला होतो. अनेक लोक पक्षी पाळतात. मात्र, त्या पक्ष्यांना बंदिस्त जीवन जगावं लागते. त्या पक्षांना मोकळा श्वास घेता येत नाही. म्हणून प्रत्येक माणसाने जर सुनील कल्ले आणि सुनीता कल्ले या दाम्पत्य यांच्यासारखं पक्ष्यांचं संगोपन केलं तर पशुपक्षी वाचतील. प्रत्येकाला त्यांचा सुमधुर आवाज ऐकायला मिळेल. इतकेच नव्हे तर सकाळी पक्ष्यांचा किलबिलाट ऐकायला मिळून त्यांची सकाळी निसर्गरम्य वातावरणात होईल.
  First published:

  Tags: Akola News, School

  पुढील बातम्या