मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /झोपेतून उठून पती-पत्नी आवरत होते घर, अचानक कोसळली वीज आणि....

झोपेतून उठून पती-पत्नी आवरत होते घर, अचानक कोसळली वीज आणि....


रात्रीपासून अंबरनाथ तालुक्याच्या ग्रामीण भागात विजेच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस कोसळत आहे.

रात्रीपासून अंबरनाथ तालुक्याच्या ग्रामीण भागात विजेच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस कोसळत आहे.

रात्रीपासून अंबरनाथ तालुक्याच्या ग्रामीण भागात विजेच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस कोसळत आहे.

बदलापूर, 07 सप्टेंबर : घरावर वीज कोसळून पती-पत्नीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना बदलापूर जवळील ग्रामीण भागात घडली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

आज सोमवारी सकाळी सव्वा सहाच्या दरम्यान धामणवाडी या आदिवासी पाड्यात ही घटना घडली. या पाड्यात राहणाऱ्या कडाळी कुटुंबीयांच्या घरावर वीज कोसळली होती. यात मोरेश्वर कडाळी आणि बुधा कडाळी या पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाला.

कोयत्याला मिळेल न्याय, पंकजा मुंडेंचं भावनिक ट्वीट; मुख्यमंत्र्यांशी करणार चर्चा

रात्रीपासून अंबरनाथ तालुक्याच्या ग्रामीण भागात विजेच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस कोसळत आहे. याच दरम्यान, कडाळी यांच्या घरावर वीज कोसळली. हे दोघे पती-पत्नी सकाळी उठून घरातील काम करत होते, त्याच वेळेस त्यांच्या अंगावर ही वीज कोसळली.

बाजूच्या खोलीत झोपलेले मुलं आई-बाबांना उठवण्याचा प्रयत्न करीत होते. मात्र, ते प्रतिसाद देत नसल्याचे पाहून त्यांनी आपल्या काका काकीला बोलावले तेव्हा हा प्रकार समोर आला.

खरं की खोटं? कोरोना लॉकेट व्हायरसला आपल्यापासून ठेवतो दूर

दरम्यान, या दोघांचे मृतदेह सध्या बदलापूर मधील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहे. आई-वडिलांच्या जाण्याने दोन लहान मुले पोरकी झाली आहेत. त्यामुळे तहसीलदारांनी लवकरात लवकर पंचनामे करून या कुटुंबाला आर्थिक मदत करावी अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य गावकऱ्यांनी केली आहे.

First published:

Tags: बदलापूर