Home /News /maharashtra /

जगावं तरी कसं? मेंढपाळावर कोसळलं मोठं संकट, वीज पडून 40 मेंढ्या जागीच ठार

जगावं तरी कसं? मेंढपाळावर कोसळलं मोठं संकट, वीज पडून 40 मेंढ्या जागीच ठार

अहमदनगर तालुक्यातील खातगाव शिवार येथे वीज पडून एकाच वेळी 40 मेंढ्या जागेवरच दगावल्या आहेत.

अहमदनगर, 13 जून: अहमदनगर तालुक्यातील खातगाव शिवार येथे वीज पडून एकाच वेळी 40 मेंढ्या जागेवरच दगावल्या आहेत. निमगाव घाणा येथे शनिवारी दुपारी दोन वाजता ही धक्कादायक घटना घडली. हेही वाचा...पोलिसांना कोरोनाचा विखळा! मुंबईत गेल्या 24 तासांत 4 पोलिस कर्मचाऱ्यांचा मृत्यू मेंढपाळ संतोष पवार नेहमीप्रमाणे निमगाव घाणा रस्त्यावर मेंढ्या चारण्यासाठी गेले होते. या परिसरात सकाळपासून ढगाळ वातावरण होतं. दुपारी 2 च्या सुमारास काळेकुट्ट ढग दाटून आले होते. तितक्यात जोरात विजेचा कडकडाट झाला. संतोष पवार यांच्या मेंढ्याच्या अंगावर जोरदार वीज पडली. यात 40 मेंढ्या जागीच ठार झाल्या. या घटनेची माहिती मिळताच ग्रावकऱ्यांनी घटनास्थळाकडे मदतीसाठी धाव घेतली. अहमदनगर जिल्ह्यात शनिवारी सकाळपासून ढगाळ वातावरण होतं. त्यात काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी तुरळक पाऊस झाला. विजांच्या कडकडाटासह व मेघगर्जनेसह पाऊस होईल, असा हवामान खात्याचा अंदाज आहे. दरम्यान, यंदा जूनच्या पहिल्याच आठवड्यात बऱ्यापैकी पाऊस होत असल्यानं शेतकऱ्यांमध्ये दिलासादायक चित्र दिसत आहे. खरीप हंगामाच्या पेरणीच्या कामास सुरूवात झाली आहे. गेल्या 10 दिवसांमध्ये जिल्ह्यात सरासरी 94 मिलिमीटर म्हणजेच जवळपास 18 टक्के पावसाची नोंद झाली आहे. नगर जिल्ह्यात जून ते ऑक्टोबर या काळात सरासरी 515 मिलिमीटर पावसाची नोंद होत असते. हेही वाचा...शेतातील गंजीला अचानक लागली आग, वृद्ध दाम्पत्याचा अक्षरश: झाला कोळसा मागील वर्षी जूनच्या पहिल्या दहा दिवसांमध्ये केवळ 26 मिलिमीटर म्हणजे अवघ्या 5 टक्के पावसाची नोंद झाली होती. परंतु यंदा मात्र जूनच्या पहिल्याच आठवड्यात मागील वर्षाच्या तुलनेत तब्बल 13 टक्के जास्त पाऊस झाला आहे.
Published by:Sandip Parolekar
First published:

Tags: Ahmednagar, Farmer

पुढील बातम्या