बीडमध्ये वीज कोसळून 7 जणांचा मृत्यू

बीडमध्ये वीज कोसळून 7 जणांचा मृत्यू

धारूर आणि माजलगाव तालुक्यातील काही भागात वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाला.

  • Share this:

07 आॅक्टोबर : बीड जिल्ह्यात वीज पडून सहा जणांचा मृत्यू झाला तर पाच जण गंभीर जखमी झालेत. तर माजलगाव तालुक्यातील लोनगाव येथेही एका महिलेचा वीज कोसळून मृत्यू झाला.

आज दुपारी धारूर आणि माजलगाव तालुक्यातील काही भागात वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाला. यावेळी दुपारी ४ वाजताच्या सुमारास धारूर तालुक्यातील चारदरी येथील शेतात बाजरी काढण्यासाठी गेलेल्या 10 व्यक्ती पावसामुळे घागरवाडा माळावर एका झाडाखाली बसले असता झाडावर वीज कोसळून खाली उतरली. या दुर्घटनेत आसाराम रघुनाथ आघाव (वय २८), उषा आसाराम आघाव (वय २५), दिपाली मच्छींद्र घोळवे (वय २१), शिवशाला विठ्ल मुंडे (वय २१) आणि वैशाली संतोष मुंडे (वय २५) हे जागीच ठार झाले तर सुमन भगवान तिडके (वय ४५), रुक्मीन बाबासाहेब घोळवे (वय ५२), कुसाबाई नामदेव घोळवे (वय ४५), सिताबाई दादासाहेब घोळवे (वय २५), सुरेखा आबासाहेब आघाव (वय १७) हे पाच जण जखमी झाले असून त्यांच्यावर धारूर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

याच सुमारास माजलगाव तालुक्यातील लोणगाव शेतात मशागतीची कामे करत असताना पाऊस आल्यामुळे लिंबाच्या झाडाखाली थांबलेल्या राधाबाई दामोदर कोळसे (वय ५५) या महिलेचा वीज कोसळून करूण अंत झाला.

(संग्रहित छायाचित्र)

First Published: Oct 7, 2017 08:40 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading