• Home
 • »
 • News
 • »
 • maharashtra
 • »
 • मुंबईसह कोकणात हलका पाऊस; तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी पुढील 5 दिवस महत्त्वाचे

मुंबईसह कोकणात हलका पाऊस; तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी पुढील 5 दिवस महत्त्वाचे

Weather in Maharashtra Today: आग ओकणाऱ्या महाराष्ट्रातील हवामानाने आता यु-टर्न घेतला आहे. राज्यभर ढगाळ वातावरण निर्माण झालं आहे, त्यामुळे पुढील पाच दिवस महाराष्ट्रातील नागरिकांना सतर्क राहण्याचा सल्ला हवामान खात्यानं दिला आहे.

 • Share this:
  मुंबई, 09 एप्रिल: मागील काही दिवसांपासून उष्णतेचा उग्र अवतार दाखवल्यानंतर महाराष्ट्रातील तापमानाचा पारा काही अंशी  घसरला आहे. आग ओकणाऱ्या महाराष्ट्रातील हवामानाने आता यु टर्न घेतला, राज्यभर ढगाळ वातावरण निर्माण झालं आहे. त्यामुळे मुंबईसह, ठाणे आणि कोकण पट्ट्यात हलक्या सरी कोसळल्या आहेत. पुढील पाच दिवस महाराष्ट्रातील बहुतांशी ठिकाणंच वातावरण ढगाळ राहणार असल्याची माहिती हवामान खात्यानं दिली आहे. काल मुंबईसह ठाणे आणि कोकणात हलका पाऊस झाल्यानंतर पुढील पाच दिवस महाराष्ट्रात विविध ठिकाणी अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सध्या पूर्व उत्तर प्रदेश, बिहार आणि विदर्भातील काही भागात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. परिणामी महाराष्ट्रातलं तापमान घसरलं असून येत्या चार दिवसांत विदर्भातील काही जिल्ह्यांसह मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे या परिसरात राहणाऱ्या शेतकऱ्यांनी आपल्या शेतीतील सर्व कामं उरकून घेण्याचा सल्ला हवामान खात्यानं दिला आहे. पुढील पाच दिवस महाराष्ट्रातील ढगाळ वातावरण हळुहळू उत्तरेकडे सरकण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील पाच दिवस महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे आहेत. उद्या महाराष्ट्रातील गोंदिया, भांडारा, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. या चार जिल्ह्यांमध्ये उद्या मेघगर्जनेसह अवकाळी पावसाचा सतर्कतेचा इशारा दिला आहे. तर कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्यातील काही भागात मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. (हे वाचा- मुंबईत weekend lockdownमध्ये कसे असणार नियम? महापालिकेने जारी केल्या नव्या सूचना) त्यामुळे पुढील पाच दिवस महाराष्ट्रासाठी खूप महत्त्वाचे आहे. विदर्भ आणि मराठवाडा हा भाग अगोदरचं दुष्काळ, अवकाळी पावसासारख्या नैसर्गिक संकटामुळे होरपळत आहे. त्यामुळे पुढील पाच दिवस महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी घोर लावणारी आहेत.
  Published by:News18 Desk
  First published: