• Home
 • »
 • News
 • »
 • maharashtra
 • »
 • 'पत्रकारांना फ्रंटलाइन वर्कर्स घोषित करावं..', अमित ठाकरेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

'पत्रकारांना फ्रंटलाइन वर्कर्स घोषित करावं..', अमित ठाकरेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

मनसे नेते अमित ठाकरे (Amit Raj Thackeray) यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून पत्रकारांना फ्रंटलाइन वर्कर्स घोषित करण्याची मागणी केली आहे. जेणेकरून लवकरात लवकर त्यांचं लसीकरण पूर्ण केलं जाईल

 • Share this:
  मुंबई, 13 मे: कोरोना काळात (Coronavirus Pandemic) वैद्यकीय कर्मचारी, पोलीस इ. फ्रंटलाइन वकर्स (Front line Workers) म्हणून काम करत आहेत. या फ्रंटलाइन वर्कर्सचं लसीकरणही पूर्ण झालं आहे. दरम्यान या काळात महत्त्वाच्या अपडेट्स लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करणारे पत्रकार मात्र अद्याप फ्रंटलाइन वर्कर्सच्या यादीत येत नाहीत. पत्रकारांना देखील फ्रंटलाइन वर्कर्स म्हणून घोषित करावं आणि त्यांचं लसीकरण पूर्ण करावं अशी मागणी गेले काही दिवस जोर धरत आहे. अनेक नेतेमंडळींनी मुख्यमंत्र्यांना त्याबाबत पत्र लिहून मागणी केली आहे. दरम्यान आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून देखील याबाबत मागणी केली गेली आहे. मनसे नेते अमित ठाकरे (Amit Raj Thackeray) यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून पत्रकारांना फ्रंटलाइन वर्कर्स घोषित करण्याची मागणी केली आहे. याबाबत त्यांनी सोशल मीडियावर देखील पोस्ट शेअर केली आहे. अमित ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना केलेल्या मागणीचं पत्र फेसबुकवर शेअर करत असं म्हटलं आहे की, 'करोना संकटकाळात स्वतःचा जीव धोक्यात घालून वार्तांकन करणाऱ्या "राज्यातील पत्रकार बांधवांना 'फ्रंटलाईन वर्कर्स' म्हणून घोषित करावं", अशी मागणी आज मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे केली. 'फ्रंटलाईन वर्कर्स'मध्ये पत्रकारांचा समावेश झाल्यास त्यांचे लसीकरण तत्काळ होईलच, पण त्याच बरोबर 'फ्रंटलाईन वर्कर्स'साठीच्या इतर सोयी-सुविधाही त्यांना मिळतील.' या पत्रामध्ये अमित ठाकरे यांनी पत्रकारांच्या कामाबद्दल नमुद केले आहे. त्यांनी असं म्हटलं आहे की, 'करोना महासाथीविरोधात सुरु असलेल्या लढाईत राज्यातील आरोग्य कर्मचारी, पोलीस यांप्रमाणे आपले पत्रकार बांधवही अत्यंत महत्वाची भूमिका बजावत आहेत. करोना महासाथीमुळे निर्माण झालेल्या प्रतिकुल परिस्थितीला अत्यंत निधड्या छातीने पत्रकार बांधव सामोरे जात आहेत आणि वार्तांकनाचं आपलं काम अविरतपणे करत आहेत.' हे वाचा-अजितदादांना हवी सोशल मीडियावर प्रसिद्धी, 6 कोटी करणार खर्च, सरकारकडून मंजुरी पत्रकारांचं प्राधान्याने लसीकरण केलं जाण्याची मागणी करताना अमित ठाकरे असं म्हणाले आहेत की, ' त्यांच्यामुळेच या कठीण काळात राज्यभरातल्या ठिकठिकाणची वास्तव स्थिती बातम्यांच्या माध्यमातून आपल्या सर्वांपर्यंत पोहोचत आहेत. दु्दैवाने, वार्तांकनाचं हे काम करताना अनेक पत्रकार, छायाचित्रकार तसंच कॅमेरामन यांना करोनाची लागण होऊन त्यामुळे त्यांपैकी काहींना आणि त्यांच्या कुटुंबातील काही व्यक्तींना आपले प्राणही गमवावे लागले आहेत. भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी तसंच वार्तांकनाचं आपलं काम पत्रकार बांधवांना निर्धोकपणे करता यावं यासाठी त्यांचा समावेश 'फ्रंटलाईन वर्कर्स'च्या यादीत करण्यात येवून त्यांना संबंधित सर्व सोयी-सुविधा देण्यात याव्यात आणि त्यांचे प्राधान्याने कोविड-१९ लसीकरण करण्यात यावे, ही आमची आग्रहाची मागणी आहे.' हे वाचा-कोरोना लस घ्यायला जाणाऱ्या मुंबईकरांनो लक्ष द्या! लसीकरण मोहिमेत BMC ने केला बदल पत्रकार, छायाचित्रकार तसंच कॅमेरामन यांचे लसीकरण करण्यासाठी जिल्हा तसंच तालुका पातळीवरील संघटनांना विश्वासात घेण्याची मागणी अमित ठाकरे यांनी केली आहे.
  Published by:Janhavi Bhatkar
  First published: