Home /News /maharashtra /

अंगावरची हळदही फिटली नव्हती, आधी गळा दाबला अन् पेटवून दिलं; घरं बंद करून पळाला पती!

अंगावरची हळदही फिटली नव्हती, आधी गळा दाबला अन् पेटवून दिलं; घरं बंद करून पळाला पती!

 काही दिवसांनी बंद खोलीतून दुर्गंधी येत असल्याने घरमालकाने स्थानिकांच्या मदतीने घराचे कुलूप तोडले, त्यानंतर घरात...

काही दिवसांनी बंद खोलीतून दुर्गंधी येत असल्याने घरमालकाने स्थानिकांच्या मदतीने घराचे कुलूप तोडले, त्यानंतर घरात...

काही दिवसांनी बंद खोलीतून दुर्गंधी येत असल्याने घरमालकाने स्थानिकांच्या मदतीने घराचे कुलूप तोडले, त्यानंतर घरात...

अंबरनाथ, 05 सप्टेंबर : पत्नीच्या (wife) चारित्र्यावर संशय घेऊन पतीने अवघ्या 15 दिवसांत आपल्याच संसाराची राखरांगोळी केल्याची घटना अंबरनाथमध्ये (ambarnath) घडली आहे. या विकृत पतीने आपल्या पत्नीची हत्या (husband killed his wife) करून तिला पेटवून दिले आणि पळ काढला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंबरनाथच्या गायकवाड पाडा भागात 22 ऑगस्ट रोजी ही घटना घडली होती. सुरज खरात यांने 15 दिवसांपूर्वी सुशीला निकाळजे या तरुणीसोबत लग्न केलं होतं. लग्न झाल्यानंतर गुण्यागोविंदाने संसार सुरू झाला. पण, सुरजच्या डोक्यात संशयाच्या भूताने जागा घेतली. लग्न होऊन  15 दिवस होत नाही तेच तो वारंवार पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत होता. यातून त्यांच्यात वाद होत होते. या वादातून तो तिला मारहाण सुद्धा करत होता. युवराजच्या एक्स-गर्लफ्रेंडसोबत लिएंडर पेसचं अफेयर! Romantic Photo Viral 22 ऑगस्ट रोजी सुरजने भाड्याने राहत असलेल्या घरात सुशीलासोबत पुन्हा वाद घातला. त्याने तिला मारहाण केली आणि गळा आवळून खून केला. आपल्या हातून खून झाला, त्यामुळे कोणताही पुरावा हाती लागू नये म्हणून त्याने तिला रॉकेल टाकून पेटवून दिले. त्यानंतर घराला कुलूप लावून तो पसार झाला. काही दिवसांनी बंद खोलीतून दुर्गंधी येत असल्याने घरमालकाने स्थानिकांच्या मदतीने घराचे कुलूप तोडले, त्यानंतर घरात महिलेचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला. अंबरनाथ शिवाजीनगर पोलिसांनी हा मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठवला. दरम्यान शवविच्छेदनात हत्या झाल्याचं समोर आलं. त्यानंतर पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला.

शिवाच्या पाय घसरला आणि शेततळ्यात पडला, त्याला वाचवायला हर्षलनेही उडी मारली, अन्.

दरम्यान, हत्येचा समांतर तपास उल्हासनगर क्राइम ब्रांच करत होता. यावेळी कोणताही धागेदोरे हाती नसताना फक्त सुरेश भैय्या या नावाच्या माध्यमातून उल्हासनगर क्राइम ब्रांचने सुरज खरात याला बदलापूर येथून सापळा रचून अटक केली. दरम्यान, सुरजने हत्येची कबुली दिली असून क्राइम ब्रांच अंबरनाथ शिवाजीनगर पोलिसांना सुरजचा ताबा दिला आहे.
Published by:sachin Salve
First published:

Tags: अंबरनाथ

पुढील बातम्या