खळबळजनक : चोरांचा 'पाण्या'वरच दरोडा, असं पळवलं 20 हजार लिटर पाणी

खळबळजनक : चोरांचा 'पाण्या'वरच दरोडा, असं पळवलं 20 हजार लिटर पाणी

या आधीही पाणी चोरीच्या काही घटना याच भागात घडलेल्या आहेत. त्यामुळे पाणी चोरी करणारी टोळी सक्रिय असल्याचा संशय ग्रामस्थांनी व्यक्त केलाय.

  • Share this:

बब्बू शेख, मनमाड 20 जुलै : सोन्या, चांदीच्या दुकानावर, बँकेवर दरोडा पडला अशा घटना घडत असतात. मात्र आता पाणीसाठ्यावरच दरोडा पडल्याची खळबळजनक घटना घडलीय. त्यामुळे दुष्काळ आणि पाणीटंचाईची तीव्रता दिसून येते. ज्या वस्तुंची टंचाई निर्माण होते त्या वस्तुंची जास्त प्रमाणात चोरटे चोरी करतात. सध्या पावसाअभावी अनेक ठिकाणी भीषण पाणी टंचाई निर्माण झाल्याचं पाहून चोरट्यांनी पाणी चोरीकडे मोर्चा वळवलाय. एका शेतकऱ्याने विकत घेऊन विहिरीत साठवून ठेवलेल्या पाण्यावरच चोरट्यांनी दरोडा घातल्याची घटना चांदवडच्या निमोण येथे घडली.

मुख्यमंत्रिपदाच्या वादावर आदित्य ठाकरेंचं हे आहे 'रोखठोक' उत्तर

योगेश रायते या शेतकऱ्याने जनावरांसाठी पाणी विकत घेवून शेतातील विहिरीत साठवून ठेवलं होतं. मात्र रात्री चोरट्यांनी मोटरच्या सहाय्याने विहिरीतलं सुमारे 20 हजार लिटर पाणी चोरुन नेलं, या घटनेमुळे निमोण शिवारात एकच खळबळ उडालीय. तर शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय.

पावसाळा सुरू होऊन दीड महिन्याचा कालावधी उलटल्यानंतरही चांदवड तालुक्यात पाहिजे तेवढा पाऊस झालेला नाही त्यामुळे  अनेक गावात पाणी टंचाई कायम असून काही शेतकरी विकत पाणी घेऊन ते विहिरीत,शेततळ्यात साठवून ठेवत असतात. तातडीच्या कामासाठी आणि गुरा-ढोरांच्या चारा पाण्यासाठी या पाण्याचा उपयोग केला जातो. आता विहिरीत साठवून ठेवलेले पाणीही चोरी होऊ लागल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालं.

योगेश रायते यांनी या पाणी चोरीची तक्रार दिली असून पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय. या आधीही पाणी चोरीच्या काही घटना याच भागात घडलेल्या आहेत. त्यामुळे पाणी चोरी करणारी टोळी सक्रिय असल्याचा संशय ग्रामस्थांनी व्यक्त केलाय.

शेतकऱ्याची गाण्यातून व्यथा मांडणारा VIDEO सोशल मीडियावर व्हायरल

अजित पवारांवर शिवसेना नेत्यांचा हल्लाबोल

शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. 'ज्याला आपल्या मुलाला निवडून आणता आलं नाही, त्याने माझ्यावर टीका करणं बरोबर नाही,' असा हल्लाबोल शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केला आहे.

VIDEO: पुण्यात जलवाहिनी फुटली; लाखो लिटर पाणी वाया

'अजित पवार स्वतःच्या मुलाला निवडून आणता आलं नाही. तेव्हा चेहरा कुणाचा काळवंडलाय हे अख्या महाराष्ट्रानं पाहिलं आहे. मी राजकारणात स्वतःच्या हिंमतीवर आलोय, माझे चुलते मुख्यमंत्री किंवा कृषिमंत्री नव्हते. बांदल, मोहिते हे गुन्हेगारी प्रवृत्तीचे आहेत. मारामाऱ्या, दंगली तुम्ही घडवायच्या, जमीन व्यवहारातून लोकांची फसवणूक तुम्ही करायची, खंडणी तुम्ही गोळा करायची आणि पोलिसांनी कारवाई केल्यावर नाव आढळराव पाटलांचं घ्यायचं, हे कुठलं राजकारण?' असा सवाल करत आढळराव पाटील यांनी अजित पवार यांच्यावर तोंडसुख घेतलं.

First published: July 20, 2019, 5:08 PM IST

ताज्या बातम्या