आई बचावली पण बछडे मात्र होरपळले

आई बचावली पण बछडे मात्र होरपळले

पुणे जिल्ह्यातल्या अवसरी गावाजवळ उसाच्या शेतात बिबट्याचे ५ बछडे जळून मृत्यूमुखी पडल्याची घटना घडली आहे. बिबट्याचे बछडे उसाच्या शेतात सापडण्याच्या घटना नेहमी घडतात पण हे बछडे आगीत जळून मरून गेल्याने परिसरातले लोक हळहळ व्यक्त करत आहेत.

  • Share this:

आंबेगाव, ३ एप्रिल : पुणे जिल्ह्यातल्या अवसरी गावाजवळ उसाच्या शेतात बिबट्याचे 5 बछडे जळून मृत्यूमुखी पडल्याची घटना घडली आहे. बिबट्याचे बछडे उसाच्या शेतात सापडण्याच्या घटना नेहमी घडतात पण हे बछडे आगीत जळून मरून गेल्याने परिसरातले लोक हळहळ व्यक्त करत आहेत.

खेड, आंबेगाव, जुन्नर, शिरूर या परिसरात सध्या ऊसतोडणी अंतिम टप्प्यात आहे. या तोडणीसाठी शेतात असलेल्या पालापाचोळ्याला आग लावली जाते. अवसरी बुद्रुकमधल्या गोपीनाथ गुणगे यांच्या शेतात अशाच पद्धतीने आग लावण्यात आली होती.

उसाचं पाचुट जळत असताना इथे बिबट्याची मादी आणि तिचे पाच बछडे दडून बसले होते. शेतात आग लागली तेव्हा ही मादी पळून गेली पण तिचे बछडे मात्र आगीमध्ये सापडले. शेतातली आग विझली तेव्हा हे बछड्यांचे हे जळून गेलेले मृतदेह मजुरांना दिसले.

'मादी बिबट्याला पकडा'

बछड्यांचा आगीत मृत्यू झाल्यामुळे बिबट्याची ही मादी बिथरण्याची शक्यता आहे. त्यामुळे या परिसरातल्या नागरिकांना सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत.

जुन्नर आणि आंबेगाव परिसरात उसाच्या शेतात बिबट्याचे बछडे सापडण्याच्या घटना याआधीही घडल्या आहेत. बिबट्याच्या अनाथ बछड्यांना पुन्हा त्यांच्या आईकडे सोपवण्याचं कामही डॉ. अजय देशमुख यांच्यासारख्या वन्यजीवप्रेमींनी केलं आहे. पण हे बछडे मात्र त्यांच्या आईपासून वेगळे होऊन आगीमध्ये सापडले.

या परिसरात आता बिबट्याच्या मादीचे हल्ले होऊ नयेत यासाठी इथे पिंजरा लावण्याची मागणी अवसरीचे उपसरपंच सचिन हिंगे यांनी केली आहे. या भागात मादी बिबट्याचे हल्ले होऊ नयेत यासाठी वनविभागाला खबरदारी घ्यावी लागणार आहे.

==========================================================================================================================================================

SPECIAL REPORT: भाजपने ताकद पणाला लावल्यानं राष्ट्रवादीची परीक्षा

First published: April 3, 2019, 6:33 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading