रानडुकरांशी दोन हात करून बिबट्याने वाचवला आपल्या बछड्यांचा जीव, पण...

रानडुकरांशी दोन हात करून बिबट्याने वाचवला आपल्या बछड्यांचा जीव, पण...

या भागात मोठ्या प्रमाणात रानडुकरे देखील असून त्यांच्या पासून आपल्या पिल्लांना वाचविताना मादीचा मृत्यू झाला असावा

  • Share this:

10 मार्च : आई आपल्या लेकरासाठी काय करू शकते याचं जिवंत उदाहरण नाशिकमध्ये पाहण्यास मिळालं. रानडुकराच्या हल्ल्यात मृत पावलेल्या मादी बिबट्याने आपल्या दोन बछड्यांना वाचवलं.

येवला तालुक्यातील लासलगाव नजीक चोंढीच्या एका शेतात बिबट्याची मादी मृत अवस्थेत आढळून आली. तिच्यापासून काही अंतरावर उसाच्या शेतात बिबट्याचे दोन बछडे देखील मिळाले. घटनेची माहिती मिळताच येवला वन विभागाचे कर्मचारी   घटनस्थळी आले आणि त्यांनी बिबट्याच्या दोन्ही बछड्याना ताब्यात घेतले. त्या नंतर मृत मादी बिबट्याचे घटनस्थळी  शवविच्छेदन करून तीचा दफनविधी करण्यात आला.

या भागात मोठ्या प्रमाणात रानडुकरे देखील असून त्यांच्या पासून आपल्या पिल्लांना वाचविताना मादीचा मृत्यू झाला असावा असा अंदाज वन विभागाच्या कर्मचाऱ्यानी व्यक्त केला आहे.

First published: March 10, 2018, 10:28 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading