VIDEO : आईच्या काळजाचा थरकाप, बिबट्याच्या पिल्लाची चिमुकल्यांसोबत विश्रांती

VIDEO : आईच्या काळजाचा थरकाप, बिबट्याच्या पिल्लाची चिमुकल्यांसोबत विश्रांती

बिबट्याच्या पिलानं एका घरात घुसून दोन चिमुकल्यांच्या मच्छरदानीत प्रवेश केला. बिबट्याच्या पिल्लाचा हा प्रताप मुलांच्या आईला लक्षात आल्याने तीने मुलांना सुखरूप बाहेर काढलं.

  • Share this:

इगतपुरी, ता.14 ऑगस्ट : बिबट्याचं मानवी वस्तित येणं हे आता नवीन नाही. अशा अनेक घटना वारंवार होत असतात. सिंमेंटचं जंगल असलेल्या मुंबईत्या अनेक भागतही बिबट्यांचा वावर असतो. नाशिक जवळच्या इगतपुरी तालुक्यातल्या धामनगाव इथं बिबट्याच्या पिलानं एका घरात घुसून दोन चिमुकल्यांच्या मच्छरदानीत प्रवेश केला. बिबट्याच्या पिल्लाचा हा प्रताप मुलांच्या आईला लक्षात आल्याने तीने मुलांना सुखरूप बाहेर काढलं.

मनिषा बर्डे यांच्या घरात आज सकाळी ही घटना घडली. इगतपुरी तालुक्यातल्या धामनगाव इथं बर्डे कुटूंब गेल्या अनेक वर्षांपासून राहातं. त्यांचं घर असलेल्या भागात भरपूर मोकळी जागा आहे. सकाळी मनिषा या आपली घरची काम करत असताना त्यांची दोन मुलं घरातल्या एका खोलीत मच्छरदानीमध्ये झोपली होती.

काही वेळानंतर मनिषा यांचं लक्ष मुलांकडे गेलं असताना त्यांना काही वेगळीच हालचाल दिसली. त्यांनी जवळ जावून पाहिलं असता मच्छरदानीत त्यांना बिबट्याचं पिल्लू दिसलं. ते पाहताच मनिषा यांच्या काळजाचा थरकाप उडाला. त्यांनी हिंमतीने दोनही चिमुकल्यांना बाहेर काढलं आणि खोलीची कडी लावून घेतली.

नंतर वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना बोलावण्यात आलं. त्यांनी बिबट्याच्या पिल्लाला पकडून प्लॅस्टिकच्या कॅरेटमध्ये बंद केलं. तीन महिन्यांच हे पिल्लू असून आपल्या आई सोबत या भागात आलं असावं असा वन कर्मचाऱ्यांचा अंदाज आहे. आता वन कर्मचारी मादी बिबट्याचा शोध घेत आहेत.

First published: August 14, 2018, 4:34 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading