मालेगाव, 11 मे : वाचून तुम्हाला विश्वास बसणार नाही, अशी एक बातमी समोर आली आहे. तुम्ही कधी कल्पना केली आहे का, मांजर, कुत्रा नाही तर थेट बिबट्याचा बछडा (Leopard Calf) तुमच्या घरी राहतोय. घरचे सर्व त्याला खूप प्रेम करताय. त्याच्या सर्वांशी खूप गट्टी जमली आहे, नाही ना. पण हे खरं आहे. वाचून तुम्हाला धक्का बसेल. पण हो, ही घटना मालेगावच्या (Malegaon) मोरदर शिवारात घडली आहे.
नेमके काय घडलं?
मालेगावच्या मोरदर शिवारातील रावसाहेब ठाकरे यांचे शेत आहे. शेतातच त्यांचे घर आहे. या घरासमोरील अंगणात लहान मुले खेळत होती. यावेळी त्यांना मांजर सापडली या आनंदात सर्वजण तिच्याशी खेळू लागले. इतकेच नव्हे तर या या मुलांची तिच्याशी छान गट्टीही जमली. मात्र, नंतर भलताच प्रकार समोर आला. घरातील मोठ्या लोकांनी या पाहुण्याला न्याहाळले तेव्हा ती मांजर नव्हे, तर चक्क बिबट्याचा बछडा आहे, असे सर्वांच्या लक्षात आले.
हेही वाचा - 3 लग्नाळू तरुण आणि 1 मुलगी, लग्नाचा भाव 2 लाख रुपये, पण लोचा झाला अन्...
यानंतर मात्र, हे कुटूंब सावध झाले आणि या बछड्याच्या आईची वाट पाहू लागले. मात्र, तब्बल आठ दिवस वाट पाहूनही ती आली नाही. त्यामुळे मोरदर शिवारातील रावसाहेब ठाकरे यांच्या कुटुंबाने बछड्याला रोज दीड लिटर दूध पाजत त्याचा सांभाळ केला. या कालावधीत ठाकरे यांच्या दीड वर्षाच्या नातीला बछड्याचा लळा लागला होता. तर अखेर यानंतर आठवड्याभराने बछड्याला वन विभागाकडे सुपूर्द करण्यात आले. यावेळी सर्वांनाच अश्रू अनावर झाले होते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Leopard, Malegaon news