बिबट्याच्या जबड्यातून भाचीला वाचवण्यासाठी मामानं केलं जीवाचं रान, नाशिकमधील थरार

बिबट्याच्या जबड्यातून भाचीला वाचवण्यासाठी मामानं केलं जीवाचं रान, नाशिकमधील थरार

शेतात खेळत असलेल्या लहानग्या पोरीवर बिबट्यांनं घातली झडप...

  • Share this:

नाशिक, 11 नोव्हेंबर: शेतात खेळत असलेल्या लहानग्या पोरीवर बिबट्यांनं झडप घातली. तिला बिबट्यानं आपल्या जबड्यात पकडून जवळपास 200 ते 300 मीटर फरफटत नेलं. चिमुकल्या भाजीच्या किंकाळ्या ऐकून जवळच काम करत असलेला मामा धावून गेला. त्यानं अक्षरशः जीवाची बाजी लावत बिबट्यावर चाल केली आणि आपल्या भाचीचे प्राण वाचवले. बिबट्या जंगलात पळून गेला. ही थरारक घटना नाशिक जिल्ह्यातील इगतपुरीत आधारवाडी येथे घडली.

हेही वाचा..भाऊ-बहिणीच्या नात्यात आडवा आला 'भाजप', माजी कृषीमंत्री गहिवरले.. पाहा VIDEO

जया धोंडीराम चवर (वय-3 वर्षे) असं चिमुकलीचं नाव आहे. बिबट्याच्या हल्ल्यात जया गंभीर जखमी झाली आहे. तिच्या मानेला गंभीर दुखापत झाली असून तिच्यावर नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून नाशिक जिल्ह्यात मानवी वस्तीकडे बिबट्यांचा वावर वाढत असल्यानं, पुन्हा एकदा बिबट्या विरुद्ध मानव असा संघर्ष होताना पाहायला मिळत आहे.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपूर्वी अंगावर शहारे आणणारा VIDEO समोर आला होता. आई आपल्या मुलांसाठी काहीही करु शकते, आपण हे बर्‍याच वेळा ऐकले असेल आणि पाहिले असेलच. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एका आईनं आपल्या पिल्लाला वाचवण्यासाठी जीवाचं रान केलं.

हेही वाचा..दाऊदच्या आर्थिक साम्राज्याला खिंडार.. कसा झाला मालमत्तेचा लिलाव, पाहा VIDEO

या व्हिडीओमध्ये रान डुकराच्या पिल्लाची शिकार करण्यासाठी बिबट्या तयारीत असतो. एक क्षण तो या पिल्लाला जबड्यात पकडतोही मात्र त्याची आई हा प्रकार पाहून संतापते आणि बिबट्याच्या जबड्यातून आपल्या पिल्लाची सुटका करवू बिबट्याला पळवून लावते. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता.

Published by: Sandip Parolekar
First published: November 11, 2020, 4:01 PM IST

ताज्या बातम्या