7 तास एकाच विहिरीत बिबट्यासमोर होता कुत्रा, तरीही बनला नाही त्याची शिकार

7 तास एकाच विहिरीत बिबट्यासमोर होता कुत्रा, तरीही बनला नाही त्याची शिकार

एक बिबट्या शिकार करण्यासाठी कुत्र्याच्या मागे लागला होता. पळता पळता दोघंही एका विहिरीत पडले. दोघेही जवळपास 7 तास एकमेकांसमोर होते. मात्र यामध्ये कुत्र्याला साधी जखम सुद्धा झालेली नाही.

  • Share this:

नंदुरबार, 21 फेब्रुवारी : मानवी वस्तीमध्ये बिबट्याने घुसून जनावरांवर हल्ला केल्याच्या अनेक घटना आपण ऐकत असतो. मात्र काही तासांसाठी बिबट्या आणि कुत्रा समोरसमोर असून सुद्धा बिबट्याने कुत्र्यावर झडप न मारल्याची घटना नंदुरबारमध्ये घडली आहे. वर्धे टेंभे या गावातील ही घटना आहे. शुक्रवारी एक बिबट्या शिकार करण्यासाठी कुत्र्याच्या मागे लागला होता. पळता पळता दोघंही एका विहिरीत पडले. दोघेही जवळपास 7 तास एकमेकांसमोर होते. मात्र यामध्ये कुत्र्याला साधी जखम सुद्धा झालेली नाही किंवा बिबट्याने सुद्धा त्याच्यावर झडप मारण्याचा प्रयत्न केला नाही. स्थानिक नागरिकांनी बिबट्या आणि कुत्रा विहिरीत पडल्याचं पाहिलं, त्यावेळी त्यांनी वनविभागाला त्यासंदर्भात माहिती दिली. त्यांनतर 4 तासांच्या प्रयत्नानंतर वनविभागाने बिबट्या आणि कुत्र्याला रेस्क्यू केलं. दोघांनाही व्यवस्थित बाहेर काढण्यात वनविभागाला आणि स्थानिकांना यश आलं आहे.

(हेही वाचा-VIDEO : 'मला मरायचं आहे...', मानसिक छळाला कंटाळून 9 वर्षाच्या मुलाची आईकडे मागणी)

एका कोरड्या विहिरीत बिबट्या आणि कुत्रा पडले होते. एवढा वेळ दोघंही एकमेकांसमोर कसे काय राहिले याबाबात आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी मात्र याबाबत आश्चर्य व्यक्त न करता वेगळी माहिती दिली आहे.  वन विभागाचे वरिष्ठ अधिकारी सुरेश केवटे यांनी सांगितलं की, प्राणी जेव्हा संकटात सापडतात तेव्हा ते एकमेकांसोबत राहतात. याठिकाणी दोघांचही आयुष्य संकटात होतं. सकाळी जेव्हा कुत्रा आणि बिबट्या या विहिरीत कोसळले, तेव्हा कुत्र्याच्या मागे 5 ते 6 कुत्रे होते. त्यांनी विहिरीत पडलेल्या कुत्र्याच्या सुरक्षेसाठी भुंकायला सुरूवात केली. त्यामुळे घाबरलेल्या बिबट्याने कुत्र्यावर हल्ला केला नाही.

First published: February 21, 2020, 9:01 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading