• Home
 • »
 • News
 • »
 • maharashtra
 • »
 • 'दया, कुछ तो गडबड है!' म्हणत राऊतांचा केंद्रावर हल्ला, देशमुखांवरील कारवाईवरून मविआ नेत्यांची टीका

'दया, कुछ तो गडबड है!' म्हणत राऊतांचा केंद्रावर हल्ला, देशमुखांवरील कारवाईवरून मविआ नेत्यांची टीका

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी देशमुख यांच्यावरील कारवाई ही कोरोनावर केंद्र सरकारला आलेलं अपयश लपवण्यासाठी केली असल्याचा आरोप केला आहे.

 • Share this:
  मुंबई, 24 एप्रिल : माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांच्या विरोधात एफआयआर (CBI filed FIR against Anil Deshmukh) दाखल करत त्यांना सीबीआयनं ताब्यात घेतलं आहे. तसंच देशमुख यांच्या घरावर सीबीआयनं धाडही टाकली आहे. या कारवाईवरून महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केंद्रावर हल्लाबोल केला आहे. शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी या कारवाईत काहीतरी काळंबेरं असल्याचा संशय व्यक्त केला आहे. तर काँग्रेसचे नाना पटोले आणि राष्ट्रवादीचे जयंत पाटील (Jayant Patil) यांनीही या कारवाईवरून आरोप केले आहेत. (वाचा-केंद्रीय महिला आयोगाने संजय राऊतांची चौकशी करावी,चंद्रकांत पाटलांची घणाघाती टीका) न्यायालयानं 100 कोटीच्या खंडणी प्रकरणी प्राथमिक चौकशी करण्याची सीबीआयला परवानगी दिली होती. पण सीबीआय धाडी टाकून या परवानगीचा गैरवापर अनिल देशमुख यांच्या बदनामीसाठी करत असल्याचा आरोप महाविकास आघाडीचे नेते करत आहेत. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी या प्रकरणी ट्विट करत सरकारला धारेवर धरलं. उच्च न्यायालयाने चौकशीचा अहवाल सादर करण्यास सांगितलं होतं. पण सीबीआय अतिरेक करत आहे, असं म्हणताच दया..कुछ तो गडबड जरूर है. असा टोला या कारवाईवरून लगावला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही सरकार या माध्यमातून राजकीय उद्दीष्ट साध्य करण्याचा प्रयत्न करत असल्याची टीका केली आहे. प्राथमिक चौकशीतून काय समोर आले हे कोर्टासमोर मांडण्याआधीच होत असलेल्या या कारवाईचा त्यांनी निषेध केला. अशा धाडी राजकीय नेत्यांना बदनाम करण्यासाठी असल्याचंही ते म्हणाले. तसंच अनिल देशमुख यांनी तपासात सहकार्य केल्याचंही जयंत पाटील यांनी म्हटलं. काँग्रेस नेते आणि राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी मात्र या प्रकरणातले बारकावे माहिती नसल्यानं याविषयी बोलण्यास नकार दिला. मात्र असं असलं तरी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी देशमुख यांच्यावरील कारवाई ही कोरोनावर केंद्र सरकारला आलेलं अपयश लपवण्यासाठी केली असल्याचा आरोप केला आहे. (वाचा-पाकिस्तानला मोफत लस पुरवता मग देशाला का नाही? नाना पटोलेंचे केंद्रावर गंभीर आरोप) मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परम बीर सिंग यांनी केलेल्या आरोपांवरून सीबीआयनं महाराष्ट्रचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि इतरांविरूद्ध एफआयआर दाखल केला आहे. याप्रकरणी सीबीआयने मुंबई-नागपूरसह विविध भागात छापेमारी केल्यानंतर अनिल देशमुखांना ताब्यात घेण्यात आलं आहे.
  Published by:News18 Desk
  First published: