घरं कसं चालवायचं? बॉलिवूड अभिनेत्री असून रिक्षा चालवणाऱ्या लक्ष्मीला कोसळले रडू

घरं कसं चालवायचं? बॉलिवूड अभिनेत्री असून रिक्षा चालवणाऱ्या लक्ष्मीला कोसळले रडू

लक्ष्मीने अनेक मराठी मालिकांमध्ये काम केलं आहे. 'देवयानी', 'लक्ष्य', 'तू माझ्या सांगती', आणि मराठी चित्रपट 'मुंबई पुणे मुंबई' या चित्रपटातही तिने काम केले आहे.

  • Share this:

 ठाणे, 28 जून : आम्ही जगायचं कसं? घरा चालवायचं कसं? सगळ्यांसाठी वेगळे कायदे आणि आमच्या करता वेगळे कायदे कसे? अनलाॅक मध्ये सर्वांना काम सुरू करण्यास परवानगी दिली मग रिक्षावाल्यांना का नाही? असा सवाल बॉलिवूड कलाकार आणि रिक्षाचालक लक्ष्मी निवृत्ती पंधे हीने उपस्थितीत केला.

लक्ष्मीने आतापर्यंत अनेक मराठी मालिका, चित्रपट आणि बॉलिवूडमध्येही काम केलं आहे. पण, उदरनिर्वाह करण्यासाठी ती रिक्षा चालवते. लॉकडाउनच्या काळात सिने इंडस्ट्रीही बंद होती. त्यामुळे कामही मिळाले नाही.  रिक्षा चालवणे त्याहुन कठीण झाले होते. अनलॉक सुरू झाल्यानंतर रिक्षा चालवण्यास परवानगी दिली. पण याही परिस्थितीत तिला अनेक अडचणींना सामोरं जावं लागत आहे.

लक्ष्मी गेल्या 15 दिवसांपासून ठाण्यात रिक्षा चालवत आहे.  रस्त्यावर  रिक्षा चालवली की पोलीस कारवाई करतात दंड लावतात. पण घरात अन्नाचा कण नाही, घर भाडं, लाईट बील, कर्जाचे हफ्ते, औषधांचा खर्च विविध खर्च भागवायचे कसे? असे सवाल या महिलेनं उपस्थितीत केले आहे.  रिक्षाच्या कर्जाचे हफ्त थांबवू शकत नाही, कर्ज नाही फेडलं तर बँका दंड लावताय. खात्यातून कर्जाचे पैसे कापले जातात, मग आम्ही करायचं? असे सवालच या महिलेनं उपस्थितीत केले.

लक्ष्मीने मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडेही मदतीसाठी याचिका केली आहे. आम्ही सगळे कृष्णकुंज बंगल्यावर येऊन भेटायला तयार आहोत, पण साहेब काही तरी करा अशी मागणीही तिने केली.

खाजगी कंपन्या चालू केल्या आहे. कंपन्यातून सुटल्यावर  काम करणाऱ्या महिला रात्री 11 वाजता एकट्या चालत जातात त्यांना काही झाले तर जबाबदार कोण? सर्वांना पगार मिळतोय पण रिक्षावाल्यांचे काय? असे अनेक प्रश्न विचारत या लक्ष्मीने आपला व्यथा मांडली आहे.  व्हिडिओमध्ये लक्ष्मीला अक्षरश: रडू कोसळलं. त्यामुळे केंद्र आणि राज्य सरकारने रिक्षा चालकांसाठी लवकरात लवकर मदत करावी हेच सांगण्याचा लक्ष्मीने प्रयत्न केला आहे.

रक्तदान करतो, तसं प्लाझ्मा दान करा; कोरोनामुक्त रुग्णांना उद्धव ठाकरेंची विनंती

लक्ष्मीने अनेक मराठी मालिकांमध्ये काम केलं आहे.  'देवयानी', 'लक्ष्य', 'तू माझ्या सांगती', आणि मराठी चित्रपट 'मुंबई पुणे मुंबई' या चित्रपटातही तिने काम केले आहे. त्याचबरोबर 'स्वराज्य रक्षक' वेबसीरीज आणि  'मराठवाड़ा' या हिंदी चित्रपटातही काम केले आहे.

बाॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते बोमन इराणी यांनी लक्ष्मी एक कलाकार असून रिक्षा चालवते, याबद्दल कौतुक केलं होतं.

संपादन - सचिन साळवे

First published: June 28, 2020, 4:52 PM IST
Tags:

ताज्या बातम्या