Home /News /maharashtra /

अखेर लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये करणार अधिकृत प्रवेश

अखेर लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये करणार अधिकृत प्रवेश

लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर अखेर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (Surekha Punekar) अधिकृत प्रवेश करणार आहे.

मुंबई, 12 सप्टेंबर: लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर अखेर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (Surekha Punekar) अधिकृत प्रवेश करणार आहे. येत्या 16 सप्टेंबरला मुंबई एनसीपी ऑफिसमध्ये पक्षप्रवेशाचा सोहळा रंगणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या (Ajit Pawar) उपस्थितीत सुरेखा पुणेकर राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षात प्रवेश करतील. बऱ्याच महिन्यांपासून सुरु होत्या चर्चा सुरेखा पुणेकर राजकारणात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा गेल्या अनेक महिन्यांपासून सुरु होत्या. जुलै महिन्यात त्यांनी स्वतः विधानसभेची निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं होतं. ''टार्ग्रेट पूर्ण करा, गळ्यात फुलांची माळ पडेल नाहीतर...'', नितीन गडकरींची शास्त्रज्ञांसह प्राध्यापकांना तंबी नांदेड जिल्ह्यातील देगलूर मतदारसंघाच्या रिक्त जागेवर निवडणूक लढवण्याची इच्छा बोलून दाखवली होती. काँग्रेसचे आमदार रावसाहेब अंतापुरकर यांचं काही महिन्या पूर्वी त्याचं दुर्दैवी निधन झाले.त्यामुळे देगलूर बिलोली मतदार संघाची ती जागा आता रिक्त झालीय. रिक्त जागेवर निवडणूक लढविण्यासाठी अनेक इच्छुकांनी गर्दी केली. आता त्या विधानसभेसाठी येणाऱ्या काही दिवसात पोटनिवडणूक देखील होणार आहे. त्यावर सुरेखा पुणेकर यांनी निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केल्यानं बरीच चर्चा रंगली होती. याआधी पुणेकरांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडे आमदार होण्यासाठी फिल्डिंग लावायला सुरुवात केली होती. मात्र त्यांना प्रतिसाद मिळत नसल्याचं त्यांनी स्वतः बोलून दाखवलं होतं. मात्र आता अखेर सुरेखा पुणेकर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अधिकृत प्रवेश करणार आहेत.
Published by:Pooja Vichare
First published:

Tags: Ajit pawar, NCP

पुढील बातम्या