राज्य सरकारचा लवासाला दणका, विशेष प्राधिकरणाचा दर्जा रद्द

राज्य सरकारचा लवासाला दणका, विशेष प्राधिकरणाचा दर्जा रद्द

लवासाचा विशेष प्राधिकरणाचा दर्जा रद्द करण्यात आलाय. लवासाला आता पीएमआरडीएच्या( पुणे विकास प्राधिकरण संस्था ) अंतर्गत ठेवण्यात आलंय.

  • Share this:

23 मे : लवासाला आज सरकारनं मोठा दणका दिलाय. लवासाचा विशेष प्राधिकरणाचा दर्जा रद्द करण्यात आलाय. लवासाला आता पीएमआरडीएच्या( पुणे विकास प्राधिकरण संस्था )

अंतर्गत ठेवण्यात आलंय. हा निर्णय म्हणजे लवासा आणि त्याची भलामण करणाऱ्या शरद पवारांना मोठा दणका मानला जातोय.

लवासाचे विशेष अधिकार काढून घेण्यात आलेत. लवासात आता कोणतंही बांधकाम करताना पीएमआरडीएची परवानगी घ्यावी लागणार आहे. शिवाय लवासा आता पीएमआरडीएच्या अंकित असल्यानं लवासातल्या विकासाला अनेक मर्यादा येणार आहेत. लवासावर अगोदरच कर्जाचा डोंगर असताना या आदेशाने लवासाचा पाय आणखी खोलात गेलाय.

काय आहे लवासा, पीएमआरडीए ?

..............................

लवासा हे शरद पवारांचं स्वप्नत शहर,

मालक अजित गुलाबचंद

पीएमआरडीएच्या कार्यकक्षेत आणल्यामुळे

शरद पवारांना धक्का

पुणे, पिंपरी चिंचवडसह अनेक तालुक्यांचा

विकास करण्यासाठी पीएमआरडीए

पीएमआरडीए म्हणजे पुणे विकास

प्राधिकरण संस्था

बांधकामासाठी आता पीएमआरडीएची

परवानगी घ्यावी लागणार

आतापर्यंत लवासा स्वत:चं बांधकाम,

निर्णय, परवानग्या स्वत:च मंजूर करायचं

आतापर्यंत लवासाला अमर्यादीत अधिकार

होते आता त्याला छाटणी

लवासात मोठ्या प्रमाणावर आर्थिक अफरातफरीचे

आरोप

मंजुरीपेक्षा जास्त बांधकाम केल्याचाही लवासावर

आरोप

हिल स्टेशन म्हणून विकास करणं अपेक्षीत

होतं पण नियमाला बगल

लवासानं पुण्यासहीत आसपासच्या गावचंही

पाणी बांधकामासाठी पळवल्याचा आरोप

आदीवासींच्या जमीनी लवासानं लाटल्याचा

आरोप, तुटपुंजे पैसे दिल्याचेही आरोप

लवासा सध्या 4 हजार कोटी रूपयांच्या

तोट्यात असल्याची माहिती

First published: May 23, 2017, 6:07 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading