लवासाचे प्रवेश शुल्क रद्द करण्याचे पीएमआरडीएचे आदेश

लवासाचे प्रवेश शुल्क रद्द करण्याचे पीएमआरडीएचे आदेश

लवासाचा विशेष प्राधिकरणाचा दर्जा रद्द झाल्यानंतर पीएमआरडीएने पहिलाच लवासाला मोठा दणका दिलाय. लवासा प्राधिकरण क्षेत्राचं प्रवेश शुल्क 15 दिवसात रद्द करण्याचे निर्देश पीएमआरडीएने दिलेत.

  • Share this:

पुणे, प्रतिनिधी, 17 ऑगस्ट : लवासाचा विशेष प्राधिकरणाचा दर्जा रद्द झाल्यानंतर पीएमआरडीएने पहिलाच लवासाला मोठा दणका दिलाय. लवासा प्राधिकरण क्षेत्राचं प्रवेश शुल्क 15 दिवसात रद्द करण्याचे निर्देश पीएमआरडीएने दिलेत. लवासामध्ये प्रवेश करण्यासाठी दुचाकीस्वारांना प्रत्येकी 200 रूपये तर चार चाकी वाहनांना प्रत्येकी 400 रूपयांचे प्रवेश शुल्क आकारलं जातं. हे दोन्ही प्रवेश शुल्क येत्या 15 दिवसात बंद करा, असे आदेश पीएमआरडीएचे प्रमुख किरण गित्ते यांनी दिलेत.

शरद पवारांचं ड्रिम प्रोजेक्ट असलेल्या लवासा सिटीला आघाडी सरकारच्या काळात विशेष प्राधिकरणाचा दर्जा देण्यात आला होता. म्हणजेच लवासाला टाऊन प्लॅनिग ऑथॉरिटीचे विशेष अधिकार प्राप्त होते. पण युती सरकारने लवासाचा हा विशेष प्राधिकरणाचा दर्जा नुकताच रद्द करून टाकलाय. त्यामुळे लवासाला आता पीएमआरडीएच्या कार्यकक्षेत आलंय.

लवासाला इथून पुढे प्रत्येक गोष्टीसाठी पीएमआरडीएची परवानगी बंधनकारक असणार आहे. त्यानुसारच पीएमआरडीएने लवासाला त्यांचं प्रवेश शुल्क रद्द करण्याचे आदेश दिलेत. या निर्णयामुळे लवासाच्या तोट्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 17, 2017 10:38 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading