Home /News /maharashtra /

आई आणि बहिणीला वाचवण्यासाठी खदानीत उडी घेतलेल्या लावण्याचा मृत्यू, डोंबिवलीतील घटना

आई आणि बहिणीला वाचवण्यासाठी खदानीत उडी घेतलेल्या लावण्याचा मृत्यू, डोंबिवलीतील घटना

परी आणि गीता दोघींना पाण्यात पोहता येत नसल्याने लावण्या घाबरली आणि तिने त्यांना वाचवण्यासाठी पाण्यात उडी घेतली.

डोंबिवली, 28 डिसेंबर :  कपडे धुण्यासाठी खदानीमध्ये गेले असता लहान बहीण पाण्यात पाय घसरून पडली तिला वाचवण्यासाठी आईने आणि बहिणीने उडी घेतली. पण दुर्दैवाने या घटनेत मोठ्या बहिणीचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना डोंबिवलीमध्ये घडली आहे. डोंबिवली जवळील हेदुटणे गावाजवळ रविवारी दुपारी आई दोन मुलींसह कपडे धुण्यासाठी खदानीत गेल्या असता लहान मुलगी पाण्यात बुडाली. तिला वाचवण्यासाठी आईने पाण्यात उडी घेतली. धक्कादायक बाब म्हणजे, या दोघींनी वाचवण्यासाठी मोठ्या मुलीनेही पाण्यात उडी घेतली. यामध्ये आई आणि लहान मुलीला वाचवण्यात यश आलं असून मोठी मुलगी पाण्यात बुडाली. प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांच्या जीवनातील काही खास गोष्टी माहीत आहेत का? मानपाडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी दुपारी आई गीता आणि मुली परी (वय 4 वर्ष) आणि लावण्या (वय 16 वर्ष) अशी पाण्यात बुडालेल्या मायलेकींची नावं आहे. गीता आपल्या दोन मुलींसह कपडे धुण्यासाठी खदानीत गेली होती. खेळता खेळता लहान मुलगी परीचा पाय घसरला आणि ती पाण्यात पडली. जय जय स्वामी समर्थ मालिका आजपासून प्रेक्षकांच्या भेटीला; हा कलाकार मुख्य भूमिकेत अशात आपल्या लेकीला वाचवण्यासाठी पोहता येत नसतानाही गीताने पाण्यात उडी घेतली. परी आणि गीता दोघींना पाण्यात पोहता येत नसल्याने लावण्या घाबरली आणि तिने त्यांना वाचवण्यासाठी पाण्यात उडी घेतली. लावण्याने मोठा हुशारीने आई आणि परीचा जीव वाचवला पण दुर्दैवाने ती त्या पाण्यात बुडाली. आज सोमवारी सकाळी 9.30 वाजता तिचा मृतदेह सापडला आहे. आई गीता आणि बहीण परी सुखरुप असल्याची माहिती देण्यात आली आहे.
Published by:sachin Salve
First published:

पुढील बातम्या