मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

'सध्या मी बेरोजगार आहे, त्यामुळे...'; पंकजा मुंडेंच्या नव्या वक्तव्याने पुन्हा चर्चांना उधाण

'सध्या मी बेरोजगार आहे, त्यामुळे...'; पंकजा मुंडेंच्या नव्या वक्तव्याने पुन्हा चर्चांना उधाण

मी कुणाला काम देऊ शकते? सध्या मी बेरोजगारच आहे. त्यामुळे कुणाला काम देऊ शकत नाही' असं वक्तव्य पंकजा मुंडे यांनी केलं आहे. (Pankaja Munde)

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई 29 सप्टेंबर : पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर पंकजा मुंडे यांचं आणखी एक विधान आता चर्चेत आलं आहे. 'मी कुणाला काम देऊ शकते? सध्या मी बेरोजगारच आहे. त्यामुळे कुणाला काम देऊ शकत नाही' असं वक्तव्य पंकजा मुंडे यांनी केलं आहे. परळी शहरात संत भगवानबाबा प्रतिष्ठान तर्फे आयोजित सार्वजनिक दुर्गा महोत्सवात त्या बोलत होत्या.

Chagan Bhujabal : ‘मी अजूनही माझ्या भूमिकेवर ठाम चुकीचं बोललोचं नाही’, छगन भुजबळांचे स्पष्टीकरण

वादग्रस्त वक्त्यावरून झालेल्या ट्रोलिंगबाबत बोलताना त्या म्हणाल्या, की 'मी तुझ्याबद्दल अफवा पसरवतो, तू माझ्याबद्दल अफवा पसरव. मी तुला ट्रोल करतो, तू मला ट्रोल कर. हे सोशल मीडियाचं युद्ध आहे'. 'जुन्या काळातलं युद्ध वेगळं होतं. नव्या काळातलं युद्ध वेगळं आहे. साहेबांच्या वेळचे नेते वेगळे होते, परिस्थिती वेगळी होती, कार्यकर्ते वेगळे होते. आत्ताचं युद्ध वेगळं आहे. हे युद्ध सोशल मीडियावर लढलं जातं, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.

या युद्धासाठी तलवारी, भाले, ढाली यांची काहीच गरज नाही. हे सोशल मीडियाचं युद्ध आहे. आपण यामध्ये बसत नाही. आपण सगळे आपलं काम करत असतो, असं पंकजा मुंडे यावेळी म्हणाल्या.

BJP Ashish Shelar : PFI आणि शिवसेनेचे काही कनेक्शन आहे का? संशय बळावतोय, आशिष शेलारांच्या वक्तव्याने तर्कवितर्क

'काकांनी देवीच्या कानात काय सांगितलं, तर ताईंना सांग मला काहीतरी काम द्या. मला ते ऐकून खूप आनंद झाला. कारण मी जर कुणाला काम देऊ शकते, याचा अर्थ मलाही काम मिळेल. सध्या मी बेरोजगारच आहे. त्यामुळे मला तुमची प्रार्थना आवडली. हे एक तीर में दो निशाण आहे, असा टोला पंकजा मुंडेंनी लगावला आहे.

First published:

Tags: Pankaja munde