ऋषिकेश होळीकर, प्रतिनिधी
लातूर, 25 मार्च: दिव्यांगांना जगण्यासाठी कुणाच्यातरी आधाराची गरज असते. पण आधारासोबतच त्यांना स्वावलंबी जगण्याचा मंत्र मिळाला तर त्यांना जगण्याची नवी उमेद मिळू शकते. हेच काम लातूर जिल्ह्यातील बुधोडा गावात सणारे स्वाधार अंध अपंग पुनर्वसन केंद्र करत आहे. हरिश्चंद्र सुडे हे गेल्या 40 वर्षांपासून अंध, अपंगांचे जीवन प्रकाशमय करत आहेत. त्यांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करून स्वावलंबी बनवत आहेत.
स्वाधार अंध अपंग पुनर्वसन केंद्राची स्थापना
लातूर जिल्ह्यातील बुधोडा येथे 80 च्या दशकात स्वाधार अंध अपंग पुनर्वसन केंद्राची स्थापना करण्यात आली. हरिश्चंद्र सुडे यांनी स्वत: नोकरी न करता समाजाप्रती कृतज्ञता म्हणून हे केंद्र सुरू केले. यामधून अनेक अंध अपंग बांधवांना स्वावलंबी जीवनाचे धडे दिले जातात. त्यांच्या अंगभूत कौशल्यांच्या सर्वांगिण विकासासाठी शिक्षण दिले जाते. तसेच दिव्यांगांच्या रोजगार आणि लग्नासाठी काम केले जाते.
स्पर्श ज्ञानातून मसाज चिकित्सा
दिव्यांगांना सहानभूती, दया नको आहे. त्यांच्या अंगभूत कौशल्याचा सर्वांगीन विकास करुन त्यांना आर्थिकदृष्टया स्वावलंबी बनवले जावे आणि समाजाच्या प्रगतीत त्यांचा हातभार लागावा, असा ध्यास सुडे यांनी घेतला. अंध युवकांच्या तीव्र स्पर्शज्ञानाचे रुपांतर व्यावसायिक कौशल्यात करण्यासाठी शास्त्रीय प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली. ॲक्युप्रेशर व मसाज चिकित्सा प्रशिक्षण दिले. अस्थिव्यंग युवकांच्या सृजनशीलतेचे रुपांतर कला-कौशल्यात करण्यासाठी ग्राफिक्स डिझाईन, डिजिटल मीडिया प्रशिक्षण दिले. दिव्यांग महिलांकरीता रोगार निर्मितीसाठी फॅशन डिझाईन व गारमेंट मेकिंग प्रशिक्षण विकसित केले आहे.
Latur News: मोलमजुरी करून आई करते सांभाळ, पृथ्वीराज अनुभवणार इस्रोचं विश्व, Video
महाराष्ट्रातील एकमेव केंद्र
प्रशिक्षण, रोजगार, लग्न – घर आणि सामाजिक पुनर्वसन अशी दिव्यांगांच्या संपूर्ण पुनर्वसनाची संकल्पना राबविणारे स्वाधार हे महाराष्ट्रातील एकमेव पुनर्वसन केंद्र आहे. या केंद्राची स्थापना करताना सुडे यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. आता या रोपट्याचे रूपांतर वटवृक्षात झाले असल्याचे समाधान वात आहे. समाजातील विविध सामाजिक संस्था, संघटना या स्वाधारला मदत करत आहेत. यामध्ये सबंध भारत देशामधील अस्थिव्यंग, अंध व्यक्ती येऊन प्रशिक्षण घेत आहेत, याचे समाधान सुडे यांनी व्यक्त केले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.