मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /लग्नाचा आनंद क्षणात स्मशान शांततेत बदलला ; भीषण अपघातात एकाच कुटुंबातील 4 ठार, 5 जखमी

लग्नाचा आनंद क्षणात स्मशान शांततेत बदलला ; भीषण अपघातात एकाच कुटुंबातील 4 ठार, 5 जखमी

लातूरमध्ये भीषण अपघात

लातूरमध्ये भीषण अपघात

लग्न आटपून नवरा, नवरीसह परतत असताना भीषण अपघाताची घटना घडली आहे. या अपघातामध्ये एकाच कुटुंबातील चार जण जागीच ठार तर पाच जण जखमी झाले आहेत.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Latur, India

लातूर, 27  मार्च : जिल्ह्यातून मोठी बातमी समोर आली आहे. लग्न आटपून नवरा, नवरीसह परतत असताना भीषण अपघाताची घटना घडली आहे. या अपघातामध्ये चार जण जागीच ठार झाले असून पाच जण जखमी झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. नवरा, नवरी या अपघातातून सुखरूप बचावले आहेत. औसा तालुक्यातील चलबुर्गा पाटीजवळ सकाळी हा अपघात घडला आहे.

पुण्यावरून परतत असताना अपघात  

घटनेबाबत अधिक माहिती अशी की, पुण्यातील लग्न समारंभ आटपून गावाकडे परतत असताना सकाळच्या सुमारास हा अपघात झाला. चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्यानं वाहन पलटी झाले. औसा तालुक्यातील चलबुर्गा पाटी जवळ हा भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाला आहे. तर पाच जण जखमी झाले आहेत. जखमींना स्थानिकांच्या मदतीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अद्यापपर्यंत या अपघातातील मृतांची नावं समोर येऊ शकलेली नाहीयेत.

  नवदाम्पत्य सुखरूप  

विवाहसोहळा आटोपल्यानंतर  नवरा नवरी आणि वऱ्हाडी दोन वाहनाने गावी निघाले होते. मात्र चलबुर्गा पाटीजवळ आल्यानंतर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटलं आणि गाडी पलटी झाली. या अपघातामध्ये चार जणांचा मृत्यू झाला आहे, तर पाचजण जखमी झाले आहेत. नवदाम्पत्य या अपघातातून थोडक्यात बचावल्याची माहिती समोर येत आहे.

First published:
top videos

    Tags: Accident, Latur