मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /छत्रपती संभाजी नगर आणि हिंगोलीच्या विद्यार्थ्यांमध्ये राडा, जवळपास 20 ते 22 विद्यार्थी जखमी; नेमकं काय घडलं?

छत्रपती संभाजी नगर आणि हिंगोलीच्या विद्यार्थ्यांमध्ये राडा, जवळपास 20 ते 22 विद्यार्थी जखमी; नेमकं काय घडलं?

विद्यार्थ्यांमध्ये राडा

विद्यार्थ्यांमध्ये राडा

छत्रपती संभाजी नगर आणि हिंगोली जिल्ह्यातील विद्यार्थ्यांमध्ये वादातून राडा झाल्याची माहिती समोर आली आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Hingoli, India

हिंगोली, 6 मार्च : कळमनुरी आदिवासी विकास प्रकल्पातील विद्यार्थ्यांना लातूरच्या स्वामी विवेकानंद नामांकित इंग्रजी शाळेत गंभीर मारहाण करण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगर आणि हिंगोली जिल्ह्यातील विद्यार्थ्यांमध्ये वादातून राडा झाल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये दोन्ही जिल्ह्यातील जवळपास 20 ते 22 विद्यार्थी जखमी असल्याची माहिती आहे.

शाळा प्रशासनाने जवळपास दिडशेहून अधिक विद्यार्थ्यांना कळमनुरीत आणून सोडले आहे. हिंगोलीतील कळमनुरी आदिवासी विकास प्रकल्पाच्या काही विद्यार्थ्यांना लातूर येथील स्वामी विवेकानंद नामांकित इंग्रजी शाळेमध्ये छत्रपती संभाजीनगरच्या विद्यार्थ्यांकडून गंभीर मारहाण झाल्याची घटना घडली आहे.

हिंगोली जिल्ह्यातील आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील एका विशिष्ट समाजाचे विद्यार्थी लातूर येथील स्वामी विवेकानंद नामांकित इंग्रजी शाळेत शिक्षण घेतात. दोन विद्यार्थ्यांमध्ये झालेल्या किरकोळ वादातून विद्यार्थ्यांचे मोठे भांडण झाले. आणि या वादाचे रुपांतर मोठ्या हाणामारीत झाले. दोन्ही जिल्ह्यातील 20 ते 22 विद्यार्थी जखमी असल्याची माहिती विद्यार्थ्यांनी दिली आहे.

छत्रपती संभाजीनगर : 'पोराला कॉपी द्यायला जाऊ द्या', परीक्षा केंद्रावर पालकच शिक्षकांना भिडले, VIDEO

आज सकाळी शाळा प्रशासनाने जवळपास दिडशेहून अधिक विद्यार्थ्यांना कळमनुरीच्या प्रकल्प अधिकारी कार्यालयात आणून सोडले असून कार्यालयाने या विद्यार्थ्यांना त्यांच्या पालकांच्या हवाली केले आहे.

दरम्यान लातूरमध्येही हाणामारीची गंभीर घटना घडली आहे. मात्र, नेमके किती विद्यार्थी जखमी आहेत, याबाबत अद्याप स्पष्ट माहिती नसल्याचे कळमनुरी आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी यांनी सांगितले. या गंभीर घटनेची माहिती घेण्यासाठी प्रकल्प कार्यालयाचे पथक लातूरला देखील जाणार आहे, अशी माहिती मिळाली आहे.

First published:
top videos

    Tags: Chhatrapati Sambhaji Nagar, Latur, Students