ऋषिकेश होळीकर, प्रतिनिधी
लातूर, 31 मार्च : इचलकरंजीमध्ये झालेल्या कुस्ती स्पर्धेत लातूरच्या सोनबा लवटे या मल्लानं बाजी मारली. त्यानं 110 किलो वजन गटामध्ये 'कुमार महाराष्ट्र केसरी' हा किताब पटकावलाय. या विजेतेपदानंतर त्याला मानाची चांदीची गदा देण्यात आलीय. लातूर जिल्ह्यातील कुस्तीच्या परंपरत या यशानं आणखी भर पडलीय, असं मत आता व्यक्त होत आहे.
वडिलांकडून शिकले डावपेच
सोनबा हा लातूर जिल्ह्यातील हासेगाववाडी येथील रहिवाशी आहे. त्याचे वडील अल्पभूधारक शेतकरी असून आई घरकामासोबतच वडिलांना शेतीमध्ये मदत करते. त्याचे वडिलांची उत्तम पैलवान अशी परिसरात ओळख आहे. त्यांच्याकडूनच तो कुस्तीचे डावपेच सुरुवातीला शिकला. त्याचबरोबर कोल्हापूरच्या श्री शाहू विजयी गंगावेस तालिमीचाही त्याच्या यशात मोठा वाटा आहे. सोनबा गेल्या चार वर्षांपासून याच तालमीमध्ये कुस्तीचा सराव करत आहे.
पृथ्वी आणि यशस्वीच्या मित्रानं व्यक्त केली मोठी इच्छा! मुंबईकर करणार पूर्ण? Video
'माझे वडिल शेतकरी आहेत. ते स्वत: चांगले पैलवान असल्यानं मला त्यांनी नेहमीच मदत केली. माझ्या यशाचं श्रेय आई-वडिलांसह घरातील सर्व मंडळींचं आहे. मला वरिष्ठ गटातील महाराष्ट्र केसरी व्हायचं आहे. मी तो किताब जिंकावा असं माझ्या वडिलांचं स्वप्न आहे. मी ते पूर्ण करेल,' असा विश्वास सोनबानं यावेळी बोलून दाखवला.
लातूरमध्ये चक्क उन्हाळी सोयाबीन, शेतकऱ्याच्या प्रयोगाची चर्चा तर होणारच! पाहा Video
कुस्तीपटू सोनबा लवटे याला लातूर जिल्हा क्रीडा संकुलात सुरेंद्र कराड, चेतन जावळे, संतोष इगवे यांनी प्रशिक्षण दिले. ‘कुमार महाराष्ट्र केसरी’ स्पर्धेचे 26 मार्च रोजी इचलकरंजी येथे आयोजन करण्यात आले होते. अंतिम सामन्यात सोनबा लवटे याने पै. आर्यन पाटील याला 01-08 या गुण फरकाने पराभूत करून विजय मिळवला. लातूरचे जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांनीही त्याचं अभिनंदन करत सत्कार केला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.