मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

वृद्ध आई-बाबांना न सांभाळणाऱ्या अधिकाऱ्याच्या पगारातून 30 टक्के कपात, लातूर जिल्हा परिषदेचा निर्णय

वृद्ध आई-बाबांना न सांभाळणाऱ्या अधिकाऱ्याच्या पगारातून 30 टक्के कपात, लातूर जिल्हा परिषदेचा निर्णय

'अधिकारी-कर्मचारी हे जर आपल्या वृद्ध आई वडिलांना सांभाळत नसतील तर त्यांच्या एकूण पगाराच्या 30 टक्के रक्कम ही संबंधितांच्या आई वडिलांच्या खात्यात जमा करावी'

लातूर, 13 नोव्हेंबर : जिल्हा परिषदेचे अधिकारी-कर्मचारी जर आपल्या वृद्ध आई-वडिलांना सांभाळत नसतील तर त्यांच्या पगाराच्या 30 टक्के रक्कम ही आई-वडिलांच्या खात्यामध्ये दरमहा जमा करण्यात येणार, असा ऐतिहासिक ठराव लातूर जिल्हा परिषदेत मांडण्यात आला आहे.  या ठरावाला सर्व सभासदांनी मान्यताही दिली आहे.

लातूर जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा 10 नोव्हेंबर रोजी अध्यक्ष राहुल केंद्रे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. आणि याच सभेत एक ऐतिहासिक निर्णय लातूर जिल्हा परिषदेनं घेतला आहे. जो सगळ्याच जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या आई वडिलांसाठी संजीवनी ठरला आहे.

कोरोनाचं भान ठेवा! दिवाळीनिमित्त घरी पार्टी करताना ही काळजी घ्या

ज्या वयात आई-वडिलांना आधार द्यायचा असतो, त्याच काळात मुलं त्यांची साथ सोडून देत असल्याच्या घटना वारंवार समोर येत आहे. उतर वयात आई-वडिलांचा सांभाळ करण्याची जबाबदारी ही त्यांच्या मुलांवर असते. पण, बऱ्याच वेळा मुलं ही जबाबदारी पार पाडत नसल्याचे समोर आले. त्यामुळे उतार वयात आई-बाबांना वृद्धाश्रमाचा आसरा घ्यावा लागतो, त्यामुळे लातूर जिल्हा परिषदेनं वृद्ध आई-बाबांची बाजू घेत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

लातूर जिल्हा परिषदेमध्ये जवळपास साडेबारा हजार कर्मचारी कार्यरत असून एकूण 14 विभाग आहेत. या सर्व विभागांतर्गत कार्यरत अधिकारी-कर्मचारी हे जर आपल्या वृद्ध आई वडिलांना सांभाळत नसतील तर त्यांच्या एकूण पगाराच्या 30 टक्के रक्कम ही संबंधितांच्या आई वडिलांच्या खात्यात जमा करावी, असा ठराव  सर्वसाधारण सभेत सर्वसंमतीने पारित करण्यात आला आहे.

शरद पवारांच्या बारामतीत नगरपालिकेवर पहिल्यांदा फडकले काळे झेंडे!

जिल्हा परिषदेचे कर्मचारी असलेल्या ज्यांच्या आई वडिलांना कर्मचारी सांभाळत नाहीत त्यांनी जिल्हा परिषदेकडे तक्रार करावी, असं आवाहन देखील जिल्हा परिषदेच्या वतीने करण्यात आले आहे.

First published: