मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

रात्री गावाकडे जाण्यासाठी ST बस नव्हती म्हणून तरुणांनी केलं धक्कादायक कृत्य, अख्खं प्रशासन हादरलं

रात्री गावाकडे जाण्यासाठी ST बस नव्हती म्हणून तरुणांनी केलं धक्कादायक कृत्य, अख्खं प्रशासन हादरलं

लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातल्या औराद शहाजानी बस स्थानकातील ही घटना आहे.

लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातल्या औराद शहाजानी बस स्थानकातील ही घटना आहे.

लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातल्या औराद शहाजानी बस स्थानकातील ही घटना आहे.

लातूर, 4 फेब्रुवारी : गावाकडे जाण्यासाठी रात्री उशिरा एसटी बस नव्हती म्हणून बस स्थानकातून एसटीच पळवून नेण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातल्या औराद शहाजानी बस स्थानकातील ही घटना आहे.

रात्री उशिरा गावात जाण्यासाठी एसटी नसल्यानं दारूच्या नशेत शेळगी गावातल्या तरुणांनी एसटीच पळवून नेली. एसटी पळवताना लाईटच्या दोन खांबांना देखील जोराची धडक बसल्यानं विजेच्या तारा तुटून खाली पडल्या. शिवाय विजेचा खांब देखील कोसळला आहे. पहाटेच्या सुमारास बस स्थानकात झोपलेल्या बसच्या चालक आणि वाहकाला एसटी जाग्यावर नसल्याचं समजताच त्यांनी पोलीस ठाणे गाठले.

एसटी कर्मचाऱ्यांच्या तक्रारीनुसार औराद पोलिसांनी शोध घेतल्यानंतर शेळगी गावात एसटी बस सापडली. तरुणांनी एसटी बस पळवून नेताना झालेल्या अपघातामुळे एसटीचं 25 हजारांचं नुकसान झालं आहे. मात्र एसटी खात्याकडून कोणत्याही प्रकारची तक्रार पोलीस ठाण्यात नसल्यानं गुन्हाच नोंद झालेला नाही.

हेही वाचा - तरुणी बनून करायचा ड्रग्सचा व्यवहार, दाऊदला पुरवायचा कोट्यवधी रुपये!

एवढा धक्कादायक प्रकार घडल्यानंतर एसटी विभागाकडून गुन्हा नोंदवण्यात न आल्याने एसटीचा गलथानपणा या निमित्तानं चव्हाट्यावर आला असून नेमकी एसटी कोणी पळवून नेली? एसटी पळवणाऱ्यांना पोलीस प्रशासन व एसटी खातं पाठीशी घालण्याचा प्रयत्न करतंय का, असा प्रश्न परिसरात चर्चिचा जात आहे.

First published:

Tags: St bus