Home /News /maharashtra /

Latur News : शेतात जाऊन पोलिसाने केली शेतकऱ्याला बेदम मारहाण, व्हिडीओ व्हायरल

Latur News : शेतात जाऊन पोलिसाने केली शेतकऱ्याला बेदम मारहाण, व्हिडीओ व्हायरल

शेतकरी गंगाधर कोतवाड यांचा शेजारील शेतकऱ्यासोबत शेतीच्या कारणावरुन वाद झाला होता.

लातूर, 01 एप्रिल :  लातूर (Latur) जिल्ह्यातील देवणी तालुक्यातील चवनहिप्परगा गावात एका शेतकऱ्याच्या शेतात जाऊन पोलिसाने (Police) बेदम मारहाण केल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. या पोलीस कर्मचाऱ्याने लाठी आणि लाथा बुक्याने मारहाण केली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल (VIDEO Viral) झाला आहे. देवणी तालुक्यातील चवनहिप्परगा गावात ही घटना घडली आहे. शेतकरी गंगाधर कोतवाड यांचा शेजारील शेतकऱ्यासोबत शेतीच्या कारणावरुन वाद झाला होता. त्यानुसार एकाची बाजू ऐकून घेत पोलीस कर्मचारी रमेश कांबळे यांनी आपल्याला मारहाण केली, असा आरोप कोतवाड यांनी केली आहे. रमेश कांबळे यांनी शेतात जाऊन शेतकऱ्याला बेदम मारहाण केली. लाकडी काठीने मारहाण करत असल्याचे व्हिडीओतून दिसून येत आहे. याप्रकरणी संबंधित पोलिसावर कारवाईची मागणी शेतकऱ्याने केली आहे. या प्रकरणी पोलिसांत अद्याप कोणतीही तक्रार दाखल करण्यात आलेली नाही. बीडमध्ये दोन गटात मारामारी दरम्यान, बीडमध्ये शेतीच्या वादातून नेकनूरमध्ये दोन गटांमध्ये तुंबळ मारामारी झाल्याचा प्रकार घडला आहे. विशेष म्हणजे दोन गटांमधला हा वाद वाढला आणि त्यांच्यात राडा झाला.  धारदार शस्त्राचा वापर केल्याने या प्रकरणामध्ये 6 जण जखमी झाले असून, या सर्वांवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शरद पवारांच्या नावाने ओळखली जाणार 'सह्याद्री'तील वनस्पती, Argyreia Sharadchandra नेकनूरमधील दोन गटांमध्ये गेल्या काही दिवसांपासून शेतीच्या मुद्द्यावरून वाद सुरू होता. हा वाद दिवसेंदिवस वाढत गेला आणि अखेर या वादाचं रुपांतर प्रचंड मारामारीत झालं. विशेष म्हणजे, या मारामारीमध्ये धारदार शस्त्राचा वापर करण्यात आला. त्यातून 6 जण जखमी झाले आहेत. जखमींमध्ये मोहम्मद फहाद कफील, अब्दुल अहाद अब्दुल बासेद, सहाद अब्दुल अहाद, अस्लम पाशा, गुलाम पाशा, अब्दुल सबुर यांचा समावेश आहे. या बाबांनी जिंकलं नेटकऱ्यांचं मन, मुलगी कामावर सोडतच नाही म्हणून केला जुगाड या सर्वांवर शासकीय रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. अगदी शासकीय रुग्णालयापर्यंत हा संपूर्ण वाद पोहोचल्याचं पाहायला मिळालं. या रुग्णालयातही या दोन गटांतील सदस्यांची एकमेकांबरोबर मारामारी झाली. हा प्रकार सुरू असतानाच कोणीतरी या संपूर्ण राड्याचा व्हिडिओ तयार केला आणि सोशल मीडियावर हा व्हिडिओ पोस्ट केला. काही वेळातच सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळं परिसरात या संपूर्ण प्रकाराची चर्चा रंगलेली पाहायला मिळाली.
Published by:sachin Salve
First published:

पुढील बातम्या