'बाबा, आम्ही करून दाखवलं!' दोन्ही भावांच्या विजयानंतर रितेश देशमुखनं केली भावुक पोस्ट

लातूरमध्ये देशमुख बंधूंनी निर्विवाद यश मिळवल्यानंतर तिसरा भाऊ आणि अभिनेता रितेश देशमुख याच्या भावनिक ट्वीटची चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे.

News18 Lokmat | Updated On: Oct 24, 2019 07:42 PM IST

'बाबा, आम्ही करून दाखवलं!' दोन्ही भावांच्या विजयानंतर रितेश देशमुखनं केली भावुक पोस्ट

मुंबई, 24 ऑक्टोबर : लातूरमध्ये देशमुख बंधूंनी निर्विवाद यश मिळवल्यानंतर तिसरा भाऊ आणि अभिनेता रितेश देशमुख याच्या भावनिक ट्वीटची चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे. दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांची दोन मुलं निवडणुकीच्या रिंगणात होती. त्या दोघांनाही यश मिळाल्यानंतर रितेश देशमुख यांनी ट्वीटवरून आपल्या भावना व्यक्त केल्या. 'आम्ही करून दाखवलं' अशा अर्थाचं हे ट्वीट अमित देशमुखांनी केलं.

मराठवाड्यातली लातूरची लढत काँग्रेससाठी आणि देशमुख कुटुंबीयांसाठी प्रतिष्ठेची होती.या दोन्ही जागा धीरज आणि अमित देशमुखांनी जिंकल्यामुळे लातूरवर देशमुखांची पकड सिद्ध झाली.लातूरमध्ये देशमुखं घराणं गड राखणार की नाही याकडे साऱ्या राज्याचं लक्ष होतं. दिवंगत विलासराव देशमुख यांचे पुत्र धीरज देशमुख 1 लाख 19 हजार 826 मताधिक्यानं विजयी झाले. अमित देशमुखांनाही 42000 हून अधिक मताधिक्य मिळालं.

लातूर ग्रामीण हा लातूर तालुक्यातलाच 2009 च्या मतदारसंघ पुनर्रचनेत तयार झालेला मतदारसंघ. याआधी शिवराज पाटील आणि त्यानंतर विलासराव देशमुख यांच्यामुळं लातूरवर कायमच कॉंग्रसचं वर्चस्व राहिले आहे. आता याच लातूरच्या ग्रामीण मतदारसंघातून विलासरावांचे चिरंजीव आणि जिल्हा परिषदेचे सदस्य धीरज देशमुख आता विधानसभेत गेले होते. याआधी त्यांनी याच भागातून जिल्हा परिषदेची निवडणूक लढवली होती.

विद्यमान आमदार त्र्यंबक भिसे यांनी 2014मध्ये भाजपच्या रमेश कराड यांना अटीतटीची लढत देत ही जागा आपल्या नावावर केली होती. त्यामुळं आता कॉंग्रेसचा बालेकिल्ला देशमुख कुटुंबीयांनी आपल्या नावावर केला. धीरज यांनी ग्रामीणमधून पहिल्यांदाच निवडणूक लढवली आणि ते जिंकले.

रितेश सोडता दोन्ही भाऊ राजकारणात आहेत. रितेशची ही भावुक पोस्ट सोशल मीडियावर खूप शेअर झाली.

नोटाला दुसऱ्या क्रमांकाची मते

लातूर ग्रामीण मतदारसंघात धीरज देशमुख आघाडीवर असले तरी येथे त्यांना कोणताही उमेदवार नाही तर NOTA टक्कर देत आहे. या मतदारसंघात तब्बल 7 हजार 619 मतदारांनी 'नोटा'चं (None of the Above) बटण दाबलं आहे. विशेष म्हणजे, ही दुसऱ्या क्रमांकाची मते आहेत.

वाचा -

उद्धव ठाकरेंवर टीका पडली भारी,सेनेच्या उमेदवारानेच हर्षवर्धन जाधवांना हरवले दारी

काँग्रेसपेक्षाही NCPची ताकद मोठी, एकट्या पवारांच्या जीवावर निवडणुकीचा खेळ बदलला!

‘लेक निघाली सासरला’, पंकजा मुंडेंच्या पराभवानंतर सोशल मीडियावर मिम्स व्हायरल

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 24, 2019 07:40 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...