स्कूल बस चालकाने केला 14 वर्षाच्या मुलीवर बलात्कार; पीडितेची आत्महत्या

स्कूल बस चालकाने केला 14 वर्षाच्या मुलीवर बलात्कार; पीडितेची आत्महत्या

या प्रकरणात पोलीसांनी शंकर स्वामी, सुरत ठाकुर या दोघांना ताब्यात घेतलं असन, त्यांच्यावर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय.

  • Share this:

लातूर, 4 ऑक्टोबर : औसा तालुक्यात स्कूल बस चालकाने 14 वर्षीय मुलीवर बलात्कार केला. अत्याचाराच्या घटनेनंतर मानसिक तणावाखाली असलेल्या या पीडीत मुलीने आपलं जीवन संपवलं. या प्रकरणात पोलीसांनी शंकर स्वामी, सुरत ठाकुर या दोघांना ताब्यात घेतलं असन, त्यांच्यावर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. दरम्यान, 28 सप्टेंबरला या नराधमांनी पिडीत मुलीला खामपूर परिसरात नेऊन तिच्यावर अत्याचार केला होता.

स्कूल बस चालकाने १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना औसा तालुक्यात घडली आहे. अत्याचाराच्या घटनेनंतर मानसिक तणावाखाली असलेल्या पीडित मुलीने विषारी द्रव प्राशन करुन आपली जीवनायात्रा संपवली. या प्रकरणी पोलिसांनी बसचालकासह एकाला ताब्यात घेतले आहे. शंकर महालिंग स्वामी (वय ३०) आणि सुरज हिरासिंग ठाकूर (वय २०) असे ताब्यात घेण्यात आलेल्यांची नावे आहेत. त्यांच्यावर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, हे दोघेही समदर्गा गावाचे रहिवाशी असल्याची माहिती आहे.

औसा शहराच्या एका विद्यालयात शिक्षणासाठी परिसरातील विद्यार्थी स्कुल बसने येत असतात. त्यासाठी शाळेने खंडू काळे आणि शंकर स्वामी या दोघांना बसचालक म्हणून नेमले आहे. मात्र, 28 सप्टेंबर रोजी खंडू काळेनं सुरज ठाकूरला मुलींना शाळेत सोडण्यास सांगितलं. तेव्हा सुरजने समदर्गामध्ये गॅस संपल्याचे नाटक करुन शंकरला बोलावून घेतलं आणि पिडित मुलीला खानापूर परिसरात नेऊन तीच्यावर बलात्कार केला.

या घटनेनंतर पिडित मुलीने 29 सप्टेंबर रोजी विषारी औषध प्राशन करुन आत्मह्त्या करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा तिला तत्काळ खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान तीचा मृत्यू झाला. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

 VIDEO : शतक झळकावणाऱ्या पृथ्वीला मुंबईकरांनी घेतलं अक्षरशः डोक्यावर

First published: October 4, 2018, 5:22 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading