स्पेशल रिपोर्ट : लातूर एक्स्प्रेस राजकारणाच्या 'ट्रॅक'वर

स्पेशल रिपोर्ट : लातूर एक्स्प्रेस राजकारणाच्या 'ट्रॅक'वर

उदगीर, लातूर, उस्मानाबाद ह्या मोठ्या शहरांमध्ये मुंबई-लातूर एक्स्प्रेससाठी बंद, आंदोलनं होतायत. काँग्रेसनं हा प्रश्न अस्मितेचा करून भाजपची कोंडी करण्याचा प्रयत्न केलाय.

  • Share this:

नितीन बनसोडे, लातूर

09 मे : लातूरचा रेल्वे प्रश्न आता चिघळताना दिसतोय. उदगीर, लातूर, उस्मानाबाद ह्या मोठ्या शहरांमध्ये मुंबई-लातूर एक्स्प्रेससाठी बंद, आंदोलनं होतायत. काँग्रेसनं हा प्रश्न अस्मितेचा करून भाजपची कोंडी करण्याचा प्रयत्न केलाय.

हे आंदोलन आहे लातूरची अस्मिता ठरलेल्या लातूर-मुंबई एक्स्प्रेससाठी. रेल्वे विभागानं मुंबई-लातूर गाडी पुढे उदगीर-बिदरपर्यंत वाढवलीय, त्याच्याविरोधात गेल्या काही दिवसांपासून आंदोलनं सुरू झाली आहेत. विरोध म्हणून लातूर, उस्मानाबाद ही शहरंही बंद ठेवली गेली. पण लातूरकरांच्या जखमेवर मीठ चोळत बिदरला फक्त तीन दिवस पाठवलेली रेल्वे आता सगळे दिवस तिथूनच सोडण्याचा निर्णय घेतलाय. 1 जूनपासून निर्णयाची अंमलबजावणी होईल.

विलासराव देशमुखांनी लातूरकरांचं स्वप्न पूर्ण केलं. पण त्यांच्या निधनानंतर अनेक प्रकल्प, उद्योगांनी काढता पाय घेतला. आता त्यात भाजप सरकारनं लातूरची रेल्वेच हायजॅक करत बिदरपर्यंत वाढवल्याचा आरोप होतोय. विशेष म्हणजे हीच गाडी बिदरऐवजी परळीपर्यंत सोडा अशी मागणी घेऊन धनंजय मुंडे दोन दिवसांपूर्वीच सुरेश प्रभूंना भेटले. याचाच अर्थ असा की लातूर एक्स्प्रेसवर राजकारण होतंय.

लातूर एक्स्प्रेस खरं तर बिदरपर्यंत गेली तर हे शहर दक्षिण भारताशी आपोआप जोडलं जातंय. त्यात उदगीरसारख्या मोठ्या शहराचा फायदा होईल. पण बिदरहून गाडी आली तर लातूरकरांना आरक्षणचं मिळणार नाही अशी भीती आहे. ती भीती सुरेश प्रभूंनी दूर केली किंवा लातूरहून येणाऱ्या जाणाऱ्या गाड्या वाढवल्या तर लातूरकरांचा फायदाच होईल असही जाणकरांना वाटतं.

First published: May 9, 2017, 6:41 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading