Home /News /maharashtra /

जालन्यात रावसाहेब दानवेंना धक्का, लातूरमध्ये देशमुखांना नाही करता आली जादू

जालन्यात रावसाहेब दानवेंना धक्का, लातूरमध्ये देशमुखांना नाही करता आली जादू

अनेक ठिकाणी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे तीन पक्ष एकत्र आल्याने भाजपला धक्का बसला.

    लातूर, 6 जानेवारी : राज्यभरात सध्या जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीचं वारं वाहत आहे. अनेक ठिकाणी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे तीन पक्ष एकत्र आल्याने भाजपला धक्का बसला. तर काही ठिकाणी भाजपने महाविकास आखाडीतील बंडखोरांच्या मदतीने सत्ता काबीज केली. मात्र जालना जिल्हा परिषदेत ही किमया करण्यात भाजप अपयशी ठरली आहे. या जिल्हापरिषदेवर महाविकास आघाडीचा झेंडा फडकला आहे. जालना जिल्हापरिषदेच्या अध्यक्षपदी शिवसेनेचे उत्तम वानखेडे तर उपाध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या महेंद्र पवार यांची निवड झाली. त्यामुळे केंद्रीय मंत्री आणि जालन्यातील भाजपचे ताकदवार नेते रावसाहेब दानवे यांना हा धक्का मानला जात आहे. दुसरीकडे, लातूर जिल्हा परिषद पुन्हा भाजपच्या ताब्यात गेली आहे. लातूर जिल्हा परिषद अध्यक्षपदी भाजपच्या राहुल केंद्रे तर उपाध्यक्षपदी भारतबाई दगडू सोळुंके यांची निवड करण्यात आली आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत लातूर शहर आणि लातूर ग्रामीण मतदारसंघात विजय मिळवणाऱ्या काँग्रेसच्या अमित देशमुख आणि धीरज देशमुख यांना या जिल्हा परिषदेत काही कमाल करता आली नसल्याचं स्पष्ट झालेलं आहे. राष्ट्रवादी आणि ABVP चे कार्यकर्ते भिडले, नाशिकमध्ये मोठा राडा वर्धात भाजपचे वर्चस्व वर्धा जिल्हा परिषदेवर भाजपाचे वर्चस्व पाहायला मिळालं. जिल्हा परिषद अध्यक्षपदी सरीता गाखरे तर उपाध्यक्षपदी वैशाली येरावार यांची निवड झाली. त्यामुळे वर्ध्यात महाविकास आघाडीचे पानिपत झाल्याचं पाहायलं मिळालं. अमरावतीत महाविकास आघाडीचा झेंडा अमरावती जिल्हा परिषदेत माहाविकास आघाडीची सत्ता स्थापन झाली आहे. अध्यक्षपदी बबलु देशमुख तर उपाध्यक्षपदी विठ्ठल चव्हाण यांची बिनविरोध निवड होणार आहे. कारण भाजपने निवडणुकीतून माघार घेतली आहे. भाजप उमेदवारांनी नामांकन अर्ज दाखल न केल्याने अमरावती जिल्हापरिषद अध्यक्ष उपाध्यक्ष ची निवड बिनविरोध होणार आहे.
    Published by:Akshay Shitole
    First published:

    Tags: Amit deshmukh, Ravsaheb danave

    पुढील बातम्या