आज पुन्हा इंधनाचे दर वाढले, एवढ्या रुपयांनी महागलं पेट्रोल-डिझेल

आज पुन्हा इंधनाचे दर वाढले, एवढ्या रुपयांनी महागलं पेट्रोल-डिझेल

काही केल्या इंधन दरवाढीचं सत्र कमी होण्याचं नाव घेत नाही आहे. कारण कालपासून पुन्हा इंधनाच्या दरात वाढ होण्यास सुरुवात झाली आहे.

  • Share this:

मुंबई, 08 ऑक्टोबर : काही केल्या इंधन दरवाढीचं सत्र कमी होण्याचं नाव घेत नाही आहे. कारण कालपासून पुन्हा इंधनाच्या दरात वाढ होण्यास सुरुवात झाली आहे. आजही पेट्रोल-डिझेलची दरवाढ कायम आहे. आज पेट्रोल 21 पैशांनी तर डिझेल 31 पैशांनी महागलं आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ सातत्याने वाढ होतं आहे त्यामुळे पुन्हा एकदा डिझेलच्या किंमती सोमवारी वाढ झाली आहे. दिल्लीत पेट्रोलचे दर 21 पैसे तर डिझेलचे दर 29 पैशांनी वाढले आहेत.

या दरवाढीमुळे दिल्लीत पेट्रोल दर 82.03 रुपये प्रति लिटर आहे तर डिझेलची किंमत प्रति लिटर 73.82 रुपये आहे. मुंबईतील पेट्रोल 21 पैशांनी वाढून 87.50 रुपये झालं. डिझेलची किंमत 31 पैशांनी वाढून 77.37 रुपये झाली आहे. त्यामुळे काही करा पण सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री बसणारच का असा प्रश्न आता विचारण्यात येत आहे.

केंद्र आणि राज्य सरकारनं पेट्रोल- डिझेलच्या किंमतीत पाच रूपयांची घट केल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशीपासून पेट्रोलच्या किमतीमध्ये वाढ देखील केली. पेट्रोलचे दर जवळपास ५ रुपयांनी स्वस्त झाल्यानंतर आता राज्यात डिझेलही ४ रुपयांनी स्वस्त झालंय. केंद्रानं डिझेलचे दर प्रति लिटर अडीच रुपयांनी कमी केल्यानंतर आता राज्यानं डिझेलच्या दरात  दीड रुपयांनी कपात केलीय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केली. पण त्याचं काय झालं असा संतप्त सवाल आता सर्वसामान्य विचारत आहे.

तर इंधन दरवाढीनं त्रस्त झालेल्या मुंबईकरांवर आता बेस्टच्या तिकीट दरवाढीची कु-हाड कोसळण्याची शक्यता आहे. वाढता तोटा कमी करण्यासाठी बेस्ट तिकीट आणि वीजदरांमध्ये वाढ केली जाऊ शकते. बेस्टचा अर्थसंकल्प आज मांडला जाणार असून त्यामध्ये ही वाढ करण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे.

 VIDEO : हे गंभीर आहे, आता बस चालकाला सोडून माकडांनाच द्यावी की काय नोकरी!

First published: October 8, 2018, 8:41 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading