• Home
 • »
 • News
 • »
 • maharashtra
 • »
 • LIVE: पीएनबी घोटाळ्यातील आरोपी मेहुल चोक्सी हा डोमिनिका देशात

LIVE: पीएनबी घोटाळ्यातील आरोपी मेहुल चोक्सी हा डोमिनिका देशात

महाराष्ट्र आणि देशभरातील कोरोनासह इतर महत्त्वाच्या बातम्यांचे लेटेस्ट अपडेट्स

 • News18 Lokmat
 • | May 26, 2021, 22:54 IST
  LAST UPDATED A YEAR AGO

  हाइलाइट्स

  21:52 (IST)

  डीआरडीओ-2 डीजी औषधाची दुसरी खेप उद्या दिल्लीत येणार, औषध उद्यापासून व्यावसायिकरीत्या उपलब्ध होणार असल्याची डीआरडीओची माहिती

  21:24 (IST)

  पुणे - आंबेगाव तालुक्यातील राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा पारगाव अवसरी जिल्हा परिषद गट अध्यक्ष सचिन जाधवांचा आर्थिक देवाणघेवाणीतून खून, मंचर पोलिसांनी 5 ते 6 तासांतच केलं आरोपीला जेरबंद

  19:36 (IST)

  उद्या दुपारी 3.30 वा. राज्य मंत्रिमंडळाचं मंथन
  राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्वाची चर्चा
  1 जूनपासून लॉकडाऊन सुरूच राहणार का?
  काही निर्बंध शिथिल होणार यावर चर्चेची शक्यता
  वादळग्रस्तांसाठी 250 कोटी मदतीचा प्रस्ताव अपेक्षित
  10वीचं निकाल मूल्यमापन, 11वी प्रवेशपरीक्षा
  यासंदर्भात शासनाचे आदेश येण्याची शक्यता

  19:4 (IST)

  शरद पवारांचं पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र
  पवारांनी मोदींना लक्षद्वीप विषयावर लिहिलं पत्र

  19:4 (IST)

  पवारांचे आभार मानले पाहिजेत - एकनाथ शिंदे
  'ऑपरेशन झालं असतानाही मुख्यमंत्र्यांना भेटले'
  'राज्यातील लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी पवारांची जिद्द'
  त्याला सॅल्यूट केला पाहिजे - एकनाथ शिंदे
  वादळग्रस्तांबाबत कॅबिनेटमध्ये निर्णय होईल - शिंदे
  'किनारपट्टीवरील नुकसानग्रस्तांना योग्य तो मोबदला'

  18:45 (IST)

  शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांची 'वर्षा'वर घेतली भेट, उद्धव ठाकरे आणि शरद पवारांमध्ये 40 मिनिटं चर्चा, राज्यातील राजकीय घडामोडींवर चर्चा, केंद्राकडून राज्याला मिळणाऱ्या तोकड्या मदतीवर चर्चा - सूत्र

  18:28 (IST)

  पुण्यात दिवसभरात 1158 कोरोनामुक्त
  पुण्यात दिवसभरात 683 रुग्णांची नोंद
  पुण्यात दिवसभरात 37 रुग्णांचा मृत्यू

  18:13 (IST)

  संभाजीराजे छत्रपती उद्या शरद पवारांना भेटणार
  'सिल्व्हर ओक'वर सकाळी घेणार पवारांची भेट

  17:9 (IST)

  जळगावात शिवसेनेचा भाजपला पुन्हा धक्का
  मुक्ताईनगरमधील 6 नगरसेवक शिवसेनेत
  मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत 'वर्षा'वर सेनेत प्रवेश
  एकनाथ शिंदे, गुलाबराव पाटील उपस्थित होते
  4 नगरसेवकांचा उद्या शिवसेनेत प्रवेश होणार

  17:6 (IST)

  इंडियन चार्टर्ड अकाऊंटंटच्या इंटरमीडिएट फायनल आणि पीक्यूसी परीक्षांचं वेळापत्रक जाहीर, 5 जुलैला होणार सीएच्या परीक्षा, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षिततेला प्राधान्य देत परीक्षा घेतली जाणार

  महाराष्ट्र आणि देशभरातील कोरोनासह इतर महत्त्वाच्या बातम्यांचे लेटेस्ट अपडेट्स