LIVE : 13 तासांच्या चौकशीनंतर सचिन वाझे यांना NIA कडून अटक

कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे लेटेस्ट अपडेट्स

 • News18 Lokmat
 • | March 14, 2021, 02:03 IST |
  LAST UPDATED 2 YEARS AGO

  हाइलाइट्स

  1:57 (IST)

  मुंबई पोलीस दलातील अधिकारी सचिन वाझे यांना अखेर NIA कडून अटक करण्यात आली आहे. शनिवारी तब्बल 13 तासांच्या चौकशीनंतर सचिन वाझे यांना अटक करण्यात आली. मुंबईतील एका हाय प्रोफाइल परिसरात गाडीत स्फोटकं सापडलेल्या प्रकरणात वाझे यांची चौकशी करून त्यांना अटक केली गेली आहे.

  22:1 (IST)

  21 तारखेच्या MPSC परीक्षेचं नियोजन आतापासून करा, आयत्यावेळी कारणं सांगून परीक्षा पुढे ढकलू नका, प्रवीण दरेकरांचं सरकारला पूर्वनियोजन करण्याचं आवाहन

  21:52 (IST)

  नाशिक मनपा आयुक्त कैलास जाधव यांनी केली हॉटेलवर कारवाई, मनपा आयुक्त स्वत: कारवाईसाठी रस्त्यावर उतरल्यानं हॉटेल चालकांची पळापळ, नाशिक शहरात कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी आयुक्त मैदानात, पोलीस उपायुक्त अमोल तांबेंसह मनपा अधिकाऱ्यांसोबत आयुक्तांची कारवाई, सोशल डिस्टन्स न पाळणं, ठरवून दिलेल्या क्षमतेपेक्षा जास्त गर्दी केल्यानं शहरातील 2 हॉटेलवर कारवाई

  21:37 (IST)

  नितीन अलकनुरे, श्रीपाद काळेंसोबतची चर्चा संपली
  अलकनुरे क्राईम ब्रँचचे तर काळे एटीएसचे एसीपी
  क्राईम ब्रँच, एटीएसनं तपास काय केला याची घेतली माहिती
  नितीन अलकनुरे, श्रीपाद काळे NIAच्या कार्यालयातून निघाले
  दोन्ही एसीपी 4 तास होते एनआयएच्या कार्यालयात
  सचिन वाझे अजूनही एनआयएच्या कार्यालयात
  वाझेंची साडेआठ तासांपासून NIAकडून चौकशी सुरूच
  सचिन वाझेंचा जबाब नोंदवला - सूत्रांची माहिती

  21:0 (IST)

  'न्यूज18 लोकमत'च्या रिअॅलिटी चेकनंतर प्रशासनाला जाग, अव्वाच्या सव्वा दरानं मास्कची विक्री करणाऱ्या औषध दुकानांवर सोमवारपासून होणार कारवाई, राज्याच्या औषध नियंत्रकांची माहिती

  20:16 (IST)

  नाशिक जिल्ह्यात दिवसभरात 1522 नवे रुग्ण
  नाशिकमध्ये दिवसभरात 682 रुग्ण बरे, मृत्यू 2

  19:56 (IST)

  मुंबईत दिवसभरात 1705 नवे रुग्ण
  मुंबईत दिवसभरात 5 रुग्णांचा मृत्यू

  19:34 (IST)

  नाशिक शहर हॉटस्पॉट कायम
  नाशिक शहरात दिवसभरात 811 नवे रुग्ण
  एकही बळी न गेल्यानं काहीसा दिलासा

  19:7 (IST)

  राज्यात कोरोनाचा धोका आणखी वाढला
  राज्यात दिवसभरात 15,602 नवे रुग्ण
  राज्यात दिवसभरात 88 रुग्णांचा मृत्यू
  राज्यात दिवसभरात 7467 कोरोनामुक्त
  रुग्ण बरं होण्याचं प्रमाण 92.49 टक्के
  राज्यात सध्या 1 लाख 18,525 अॅक्टिव्ह रुग्ण

  कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे लेटेस्ट अपडेट्स