महाराष्ट्र: बोलेरो कारची ट्रकला जोरदार धडक, 7 जणांचा जागीच मृत्यू

महाराष्ट्र: बोलेरो कारची ट्रकला जोरदार धडक, 7 जणांचा जागीच मृत्यू

भरधाव बोलेरोने रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रकला जोरदार धडक, गंभीर जखमी असलेल्या 4 जणांवर उपचार सुरू.

  • Share this:

सुरेश जाधव (प्रतिनिधी)बीड, 11 नोव्हेंबर: बीडमध्ये झालेल्या भीषण अपघातात 7 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. भरधाव बोलेरोने रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रकला जोरदार धडक दिल्यामुळे मोठी दुर्घटना घडली. यामध्ये बोलेरो कारमधील 6 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.ही घटना आज सकाळी 10 च्या सुमारास मांजरसुबा-पाटोदा रस्त्यावर घडली.

मृतांमध्ये काही ऊसतोड कामगारांचाही समावेश असल्याची माहिती मिळत आहे. मांजरसुंबा-पाटोदा रोडवर वैद्यकिन्ही येथे उभ्या ट्रकला भरधाव कारनं धडक दिली आणि अपघात झाला. अपघातात बोलेरो मधील सात जण जागीच ठार झाले आहेत. तर चार जण गंभीर जखमी आहेत. जखमींना सध्या स्थानिक रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. कारचालकाचं नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 11, 2019 11:31 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...