LIVE NOW

LIVE: पुत्रप्राप्तीसंदर्भातील वक्तव्यामुळे इंदोरीकर महाराज अडचणीत, 'अंनिस'ने पुन्हा दाखल केली याचिका

कोरोना त्याचप्रमाणे राज्य आणि देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे लेटेस्ट अपडेट

Lokmat.news18.com | May 6, 2021, 8:57 PM IST
facebook Twitter Linkedin
Last Updated May 6, 2021
auto-refresh

Highlights

8:57 pm (IST)

अशोक चव्हाण तुम्हाला जे जमलं नाही त्याचं खापर देवेंद्र फडणवीस आणि केंद्रावर फोडता येणार नाही जबाबदारी घ्या, अशोक चव्हाणांच्या पत्रकार परिषदेनंतर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया, एक तर यांना कायदा समजत नाही किंवा वेड पांगरून पेडगावला जाण्याचा प्रयत्न करत आहेत, आपली जबाबदारी झटकण्याचा महाविकास आघाडीचा स्वभाव मराठा आरक्षणादरम्यान देखील पाहायला मिळाला - चंद्रकांत पाटील

8:47 pm (IST)

सर्व नियम पाळून आंदोलन केलं - प्रवीण दरेकर
'प.बंगाल हिंसाचाराविरुद्ध बीडला आंदोलन केलं'
'माझ्यावर सरकार गुन्हा दाखल करतंय, हरकत नाही'
औरंगाबादचे माजी महापौर नंदकुमार घोडेले
'नंदकुमार घोडेलेंच्या वाढदिवसाचं जंगी सेलिब्रेशन'
'तिथली गर्दी मीडियाच्या माध्यमातून सर्वांनी बघितली'
घोडेलेंवर गुन्हा दाखल करण्याकडे डोळेझाक - दरेकर
'ही सरकारची सूडभावना आणि दुजाभाव नाही का?'
'कारवाई करून निष्पक्ष भूमिका सरकार घेणार का?'
वि.प.चे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरांचा सवाल

8:16 pm (IST)

राज्यात दिवसभरात 63 हजार 842 कोरोनामुक्त
राज्यात दिवसभरात 62,194 नव्या रुग्णांची नोंद
राज्यात दिवसभरात 853 कोरोना रुग्णांचा मृत्यू
रुग्ण बरं होण्याचं प्रमाण 85.54 तर मृत्युदर 1.49%
राज्यात सध्या 6 लाख 39,075 ॲक्टिव्ह रुग्ण

8:03 pm (IST)

नागपूर - जामठा परिसरातील धक्कादायक प्रकार
रुग्णाला रेमडेसिवीरऐवजी अॅसिडिटीचं इंजेक्शन
काळाबाजार करणारे 5 जण पोलिसांकडून अटकेत

7:52 pm (IST)

पुण्यात दिवसभरात 2902 नव्या रुग्णांची नोंद
पुण्यात दिवसभरात 2986 रुग्णांना डिस्चार्ज
पुण्यात दिवसभरात 86 कोरोना रुग्णांचा मृत्यू

7:49 pm (IST)

मुंबईत दिवसभरात 3056 नवीन रुग्ण
मुंबईत दिवसभरात 69 रुग्णांचा मृत्यू
मुंबईत दिवसभरात 30,942 कोरोना टेस्ट

7:44 pm (IST)

दया नायकांची बदली, गोंदियाला नवी नियुक्ती
मुंबई दहशतवाद विरोधी पथकातून उचलबांगडी
दया नायकांची जात पडताळणी विभागात बदली
तात्काळ कार्यमुक्त करण्याचे आदेश

7:18 pm (IST)

कोविन-ॲप नोंदणी आणि प्राप्त अपॉइंटमेंट स्लॉटनुसारच लसीकरण, लसीकरण केंद्रांवर गर्दी केल्यास सामाजिक दुरीकरणाची अंमलबजावणी कठीण, त्यामुळे गर्दी न करण्याचं नागरिकांना आवाहन, आवश्यक त्या बाबींची पडताळणी केल्यानंतरच लसीकरण केंद्रांवर प्रवेश देण्याचे महापालिका आयुक्तांचे निर्देश

7:01 pm (IST)

हवेतून ऑक्सिजन निर्मितीचे 38 पीएसए प्रकल्प राज्यात कार्यान्वित, दिवसाला 53 मेट्रिक टन ऑक्सिजन निर्मिती, आरोग्यमंत्री राजेश टोपेंची माहिती

6:04 pm (IST)

रत्नागिरी - गुहागरमधील धक्कादायक प्रकार
कोरोना पॉझिटिव्ह असतानाही नवरा बोहल्यावर
नवरीसह संपूर्ण वऱ्हाडींचा जीव टांगणीला
ग्रामकृती दलानं 50 हजारांचा दंड केला वसूल
शासकीय नियमाचं पालन न केल्यामुळे कारवाई

 

Load More
कोरोना त्याचप्रमाणे राज्य आणि देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे लेटेस्ट अपडेट