मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

लता मंगेशकर यांचा शेवटचा Video आला समोर, अशी सुरु होती कोविडशी झुंज

लता मंगेशकर यांचा शेवटचा Video आला समोर, अशी सुरु होती कोविडशी झुंज

गेल्या अनेक दिवसांपासून लतादीदी आजारी होत्या. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. त्याच दरम्यान लता मंगेशकर यांचा शेवटचा व्हिडिओ समोर आला आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून लतादीदी आजारी होत्या. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. त्याच दरम्यान लता मंगेशकर यांचा शेवटचा व्हिडिओ समोर आला आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून लतादीदी आजारी होत्या. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. त्याच दरम्यान लता मंगेशकर यांचा शेवटचा व्हिडिओ समोर आला आहे.

  • Published by:  Pooja Vichare

मुंबई, 07 फेब्रुवारी: भारतरत्न, गानसम्राज्ञी लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांचं रविवारी सकाळी मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात निधन झालं. वयाच्या 92 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पार्थिवावर काल संध्याकाळी मुंबईच्या शिवाजी पार्क (Shivaji Park) मैदानात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

गेल्या अनेक दिवसांपासून लतादीदी आजारी होत्या. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. त्याच दरम्यान लता मंगेशकर यांचा शेवटचा व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये लतादीदी कोणाचा तरी आधार घेऊन चालताना दिसत आहेत.

हा व्हिडीओ तेव्हाचा आहे, जेव्हा त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. त्याचवेळी, या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसून येतं आहे की त्यांची प्रकृती इतकी वाईट आहे की ती आधाराशिवाय चालू शकत नाही. दोन महिलांनी लता मंगेशकर यांना पकडलं असून त्या हळू चालत असल्याचंही व्हिडिओमध्ये दिसत आहे.

भारतरत्न लता मंगेशकर अनंतात विलीन

लता मंगेशकर यांच्या पार्थिवावर काल संध्याकाळी मुंबईच्या शिवाजी पार्क मैदानात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. लतादीदींना अखेरचा निरोप देण्यासाठी शिवाजी पार्क परिसरात हजारोंचा जनसागर लोटला होता. प्रचंड शोकाकुल वातावरणात साश्रू नयनांनी त्यांना अखेरचा निरोप देण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडून यावेळी लतादीदींना पुष्पचक्र अर्पन करण्यात आलं. त्यांच्यासह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मुख्यमंत्र्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, खासदार अनिल देसाई, मिलिंद नार्वेकर, आमदार सुनील प्रभू आदींनी देखील लता मंगेशकर यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करुन आदरांजली वाहिली.

लतादीदी 92 वर्षांच्या होत्या. लतादीदी यांच्या पार्थिवावर रविवारी संध्याकाळी मुंबईच्या शिवाजी पार्कात अंत्यसंस्कार करण्यात आले. लतादीदी यांना अखेरचा निरोप देण्यासाठी देशभरातील विविध क्षेत्रातील दिग्गज उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वत: शिवाजी पार्कात उपस्थित राहून लतादीदींना अखेरचा निरोप दिला. नरेंद्र मोदी यांच्यासह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, मनस अध्यक्ष राज ठाकरे, अभिनेता शाहरुख खान, ज्येष्ठ गीतकार जावेद अख्तर, सिनेदिग्दर्शक संजय लिला भन्साळी यांच्यासह अनेक दिग्गज आज अंत्यविधीसाठी शिवाजी पार्कात उपस्थित होते.

Lata Mangeshkar Passes Away: आज सार्वजनिक सुट्टी; काय सुरु, काय बंद वाचा सविस्तर 

लता मंगेशकर यांना 8 जानेवारी रोजी कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर त्यांच्यावर मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू होते. अगदी काही दिवसांपूर्वी त्या उपचारांना प्रतिसाद देत आहेत, अशी बातमी आली होती. त्यांचा व्हेंटिलेटर सपोर्टही काढला होता. पण शनिवारी (5 फेब्रुवारी) त्यांची प्रकृती पुन्हा बिघडली. डॉ. प्रतीत सामदानी यांची टीम त्यांच्यावर ICU मध्ये उपचार करत होती.

अगदी सामान्य परिस्थितीतून अपार मेहनतीने त्यांनी कष्ट करून आघाडीची पार्श्वगायिका म्हणून स्थान निर्माण केलं. मराठीबरोबरच हिंदी चित्रपटसृष्टीत अनभिषिक्त गानसम्राज्ञी म्हणून नाव कमावलं. सर्व प्रकारची गाणी लतादीदी गायल्या आहेत. भावोत्कट स्वर, प्रसंगानुरूपच नव्हे तर पडद्यावर ज्या नायिकेसाठी आपला आवाज असणार आहे त्या भूमिकेनुसार लता मंगेशकरांनी पार्श्वगायनातले बारकावे टिपले. सुस्पष्ट शब्दोच्चार आणि अलौकिक आवाज या जोरावर त्यांनी हे अढळ स्थान प्राप्त केलं. पण इथपर्यंत पोहोचण्याचा आणि ते स्थान शेवटपर्यंत टिकवण्याचा प्रवास सहजसाध्य नव्हता.

28 सप्टेंबर 1929 रोजी तत्कालीन इंदोर संस्थानात जन्म झालेल्या लतादीदी मंगेशकरांच्या घरातलं थोरलं अपत्य. मास्टर दीनानाथ मंगेशकर यांचं या आपल्या थोरल्या लेकीवर जीवापाड प्रेम. तिच्यातली गानप्रतिभाही त्यांनी खूप लहानपणीच हेरली. आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून लतादीदी अगदी लहानपणापासून आपसूकच ऐकून ऐकून ताना घेत असत. त्यानंतर त्यांनी रीतसर गाण्याचं शिक्षण घेतलं आणि लहानपणीच संगीत नाटकातून पं. दीनानाथ मंगेशकरांची ही लेक व्यासपीठावर वावरू लागली.

दुर्दैवानं पित्याचं छत्र बालपणीच हरपलं आणि अवघ्या 13 व्या वर्षी छोट्या लताची लतादीदी झाली. आशा, उषा, मीना आणि हृदयनाथ या पाठच्या भावंडांची पाठराखण करत आणि कुटुंबाची जबाबदारी स्वीकारत गायनाचा व्यवसाय म्हणून विचार करू लागली. 1942 मध्ये मास्टर विनायक यांच्य नवयुग सिनेमासाठी त्यांचं गाणं सुरू झालं, ते अगदी नव्वदीपर्यंत अविरत सुरू होतं. 1945 मध्ये लतादीदी मुंबईत आल्या आणि पार्श्वगायनाचं क्षेत्र त्यांच्यापुढे खुलं झालं. मग त्यांनी मागे वळून पाहिलंच नाही. अक्षरशः हजारो गाणी त्यांनी गायली. हिंदी-मराठीच नव्हे तर 36 भारतीय भाषांतली गाणी लतादीदींनी गायली.

First published:

Tags: Lata Mangeshkar - लता मंगेशकर