मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /जीवघेणा प्रवास! शिवशाहीचे 550 अपघात आणि 50हून अधिक बळी कोणामुळे?

जीवघेणा प्रवास! शिवशाहीचे 550 अपघात आणि 50हून अधिक बळी कोणामुळे?

फडणवीस सरकारमध्ये शिवसेनेचाही आपला स्वतःचा एक वेगळा ठसा उमटावा म्हणून 2016साली तत्कालीन परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी मोठा गाजावाजा करून शिवशाही बससेवा सुरु केली खरी पण पहिल्या दिवसांपासून ही लक्झरी बससेवा वादात सापडली.

फडणवीस सरकारमध्ये शिवसेनेचाही आपला स्वतःचा एक वेगळा ठसा उमटावा म्हणून 2016साली तत्कालीन परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी मोठा गाजावाजा करून शिवशाही बससेवा सुरु केली खरी पण पहिल्या दिवसांपासून ही लक्झरी बससेवा वादात सापडली.

फडणवीस सरकारमध्ये शिवसेनेचाही आपला स्वतःचा एक वेगळा ठसा उमटावा म्हणून 2016साली तत्कालीन परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी मोठा गाजावाजा करून शिवशाही बससेवा सुरु केली खरी पण पहिल्या दिवसांपासून ही लक्झरी बससेवा वादात सापडली.

    चंद्रकांत फुंदे, प्रतिनिधी

    पुणे, 27 नोव्हेंबर : कात्रज घाटात दोन दिवसांआधी शिवशाही बस पलटी होऊन 2 जणांचा बळी गेल्याने शिवशाहीची अपघातग्रस्त सेवा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. कारण, गेल्या तीन वर्षात या कंत्राटी बससेवेचे तब्बल 550 अपघात झाले असून त्यात 50 हून अधिक प्रवाशांचा बळी गेला आहे. पाहुयात या शिवशाहीचा प्रवास नेमका कशामुळे जीवघेणा बनला आहे.

    फडणवीस सरकारमध्ये शिवसेनेचाही आपला स्वतःचा एक वेगळा ठसा उमटावा म्हणून 2016साली तत्कालीन परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी मोठा गाजावाजा करून शिवशाही बससेवा सुरु केली खरी पण पहिल्या दिवसांपासून ही लक्झरी बससेवा वादात सापडली. कारण, ही बससेवा मुळात खासगी कंत्राटदारांमार्फत चालवली जाते. अशातच या बसेसवरचे चालकही हे तंत्रशुद्ध प्रशिक्षण घेतलेले नसतात. परिपाक म्हणून गेल्या तीन वर्षात शिवशाहीच्या अपघातांचं प्रमाण तब्बल पाच पटीने वाढलं आहे. स्वारगेट डेपोमधील शिवशाही बसेसची ही दैयनिय अवस्थाच खूप काही सांगून जाते.

    एक नजर शिवशाही गाड्यांच्या अपघाताच्या आकडेवारीवर

    3 वर्षात 550 अपघात

    प्राणांतिक अपघात- 51

    गंभीर अपघात- 371

    किरकोळ अपघात- 115

    शिवशाहीच्या माध्यमातून एसटी प्रवाशांना पहिल्यांदाच एसीचा गारगार प्रवास अनुभवायाला मिळत असल्याने ही निमशासकीय लक्झरी बससेवा प्रचंड लोकप्रिय बनली. पण खासगी चालकांच्या बेदरकार ड्रायव्हिंगमुळे अपघातांचं प्रमाणही तितकच वाढत गेलं. कात्रज घाटातही ड्रायव्हरचीच चुकी असलाचं डेपो मॅनेजर सचिन शिंदे यांनी म्हटलं आहे.

    इतर बातम्या - शिवशाही बस कात्रज घाटात 25 फुट खोल दरीत कोसळली, 2 प्रवाशांचा जागीच मृत्यू

    महामंडळाच्या या आरोपावर आम्ही शिवशाहीच्या एका प्रातिनिधीक बसचालकांचं नेमकं काय म्हणणं आहे ते देखील आम्ही जाणून घेतलं. शिवशाहीच्या वाढत्या अपघातांमुळे प्रवासीही आता या गाडीत बसायला घाबरतात. बसची अवस्था तर वाईट आहेच पण नवशिक्या चालकांमुळेही शिवशाहीचा प्रवास नकोसा वाटतो. असं प्रवासी सांगतात.

    एसटी महामंडळाच्या ताफ्यात सध्या अंदाजे 1200 गाड्या या 6 कंत्राटदारांकडून भाडेतत्वावर घेण्यात आल्यात. तर काही गाड्या या महामंडळाच्याच आहेत. पण खासही गाड्यांवरील सर्व चालक हे कंत्राटदार एजन्सीमार्फत भर्ती केले असल्याने अनेकदा त्यांची गुणवत्ताही नीटपणे तपासली जात नसल्याचा आरोप होतो आहे. तसंच काही ड्रायव्हर हे मद्यप्राशन करून बसेस चालवत असल्याचं आढळून आल्याने प्रवाशांमध्ये महामंडळाची प्रतिमा मलीन होत असल्याचा गंभीर आरोप एसटी महामंडळ कर्मचारी संघटनेनं केला आहे.

    शिवशाही बससेवा सुरू केल्यापासूनच एसटी महामंडळाता तोटा हा पाचशे कोटींवरून तब्बल 5 हजार कोटींवर गेल्याचा आरोप होतोय. म्हणूनच उद्धव ठाकरेंनी नव्या आघाडी सरकारचा कारभार हाती घेतल्यानंतर या शिवशाही बससेवेचा नक्कीच आढावा घ्यावा. नाहीतर खासगी कंत्राटदारांना पाठिशी घालण्याच्या नादात एसटी महामंडळच डबघाईला यायचं.

    " isDesktop="true" id="421514" >

    First published:
    top videos

      Tags: Bus accident, Pune