तालुका पॅटर्न झिंदाबाद! राज्यात 100 टक्के येणार महाशिवआघाडीचं सरकार; हा घ्या पुरावा

तालुका पॅटर्न झिंदाबाद! राज्यात 100 टक्के येणार महाशिवआघाडीचं सरकार; हा घ्या पुरावा

राज्यात शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांची महाशिआघाडी अस्तित्वात येण्याचे चिन्ह दिसत असले तरी प्रत्यक्षात त्याला वेळ आहे.

  • Share this:

सुमित सोनवणे, प्रतिनिधी

पुणे, 13 नोव्हेंबर : राज्य विधानसभेत राष्ट्रवादी, काँग्रेस पक्ष आणि शिवसेना सत्ता स्थापन करण्यासाठी दावा करण्याच्या मार्गावर असली तरी पुणे जिल्ह्यातील दौंड नगरपालिकेत मागील पावणेतीन वर्षांपासून राष्ट्रवादी, काँग्रेस पक्ष आणि शिवसेना अधिकृतरित्या महाशिवआघाडी करून सत्तेत एकत्र काम करीत आहे. त्यामुळे दौंड पॅटर्न राज्यात राबवला जाणार का? दौंड नगरपालिकेत ठरल्याप्रमाणे राज्यात घडत आहे. राज्यात महाशिवआघाडीचं ठरेल का? याबद्दल आता जनतेला उत्सुकता आहे. खंरतर वेगळे विचार असलेले हे तिन पक्ष एका तालुक्यात गुण्यागोविंदाने नांदत असतील तर राज्यातही नांदू शकतात.

बारामती पासून अवघ्या 40 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या दौंड नगरपालिकेच्या जनतेतून थेट निवडून द्यावयाच्या नगराध्यक्षपदासाठी आणि 12 प्रभागातील 24 जागांसाठी डिसेंबर 2106मध्ये मतदान झालं होतं. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे अध्यक्ष तथा माजी आमदार रमेश थोरात यांनी निवडणुकीत राष्ट्रवादी - शिवसेना आघाडीसाठी पुढाकार घेतला होता. राष्ट्रवादी व शिवसेनेची आघाडी असली तरी उमेदवारांनी आपआपल्या पक्षचिन्हावर ही निवडणूक लढविली होती.

या निवडणुकीत राष्ट्रवादी - शिवसेना आघाडी, राष्ट्रीय समाज पक्षाचे तत्कालीन आमदार राहुल कुल यांच्या नेतृत्वाखालील नागरिक हित संरक्षण मंडळ विकास आघाडी आणि भारतीय जनता पक्षाचे स्वतंत्र पॅनेल यांच्यात सरळ लढत झाली होती. नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत नागरिक हित संरक्षण मंडळाच्या शीतल योगेश कटारिया यांनी राष्ट्रवादीच्या उमेदवार मिनाक्षी नंदकुमार पवार यांचा अवघ्या 120 मतांनी पराभव केला होता.

इतर बातम्या - नदीत अंघोळ करताना सगळ्यांच्या पुढे गेला..., डोळ्यांदेखत जिवाभावाच मित्र गमावला

नगरपालिकेत सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शिवसेना, बहुजन रयत परिषद , पिपल्स रिपब्लिकन पार्टी विकास आघाडी या नोंदणीकृत गटाचे निवडून आलेले 14 आणि 2 स्वीकृत, असे एकूण 16 सदस्य आहेत. नागरिक हित संरक्षण मंडळ विकास आघाडी या गटाचे निवडून आलेले 10 सदस्य आणि 1 स्वीकृत, असे एकूण 11 सदस्य आहेत.

आघाडीच्या निवडून आलेल्या 14 सदस्यांपैकी राष्ट्रवादीचे 12 आणि शिवसेनेचे 2 सदस्य आहेत. शिवसेनेचे अवघे दोन सदस्य असले तरी एक वर्ष उपनगराध्यक्ष आणि विषय समित्यांचे सभापतिपदे मिळाल्याने शिवसेनेचा सत्तेतील वाटा अधिकचा राहिला आहे.

दौंड नगरपालिकेत ठरल्याप्रमाणे सुरू आहे आता राज्यात ठरेल का?

राज्यात शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांची महाशिआघाडी अस्तित्वात येण्याचे चिन्ह दिसत असले तरी प्रत्यक्षात त्याला वेळ आहे. मात्र दौंड नगरपालिकेत गेल्या साडेतीन वर्षांपासून शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणजेच महाशिवआघाडी एकत्रपणाने नगरपालिकेत काम करीत आहे. त्यामुळे दौंड मधील नागरिकांना आता प्रतीक्षा आहे ती राज्यात महाशिवआघाडी कधी अस्तित्वात येते ती.

Published by: Renuka Dhaybar
First published: November 13, 2019, 5:20 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading