31 मार्च : सुप्रीम कोर्टाकडून बीएस-3 (भारत स्टॅण्डर्ड स्टेज) मानंकनातील इंजिन असलेल्या वाहनांच्या खरेदी -विक्रीला 1 एप्रिलपासून बंदी घालण्यात आल्याने वाहन कंपनन्यांचे धाबे दणाणले आहे. या वाहनांचा साठा मोठ्या प्रमाणात असल्याने बीएस-3 गाड्यांच्या किंमतीत बंपर डिस्काऊंट देण्यात आलं आहे. पण हे डिस्काऊंट संपायला आता अवघे काही तास उरले आहेत.
अनेक कंपन्यांनी गाड्यांच्या किंमतीत जवळपास 12 ते 22 हजारांपर्यंत सूट दिली आहे. त्यामुळे ग्राहकांनी गाड्यांच्या शोरूममध्ये प्रचंड गर्दी केली आहे. नागपूर, पुणे आणि औरंगाबाद या सारख्या शहरांमध्ये तर गाड्या ‘आऊट ऑफ स्टॉक’ असल्यानं ग्राहकांना निराश होऊन परतावं लागलं आहे. नागपूरमध्ये तर एका दिवसात एका शोरूममध्यू चक्क सहाशे गाड्यांची विक्रमी विक्री झाली आहे.
शोरूम आज रात्री 12 वाजेपर्यंत राहणार सुरू :
महत्त्वाची बाब म्हणजे राज्यातील गाड्यांचे शोरूम आज गाड्यांच्या खरेदी-विक्रीसाठी रात्री 12 वाजेपर्यंत सुरू असणार आहे. ऑटोमोबाईल डीलर्स असोसिएशन हा निर्णय जाहीर केला आहे. 31 मार्चपर्यंत वाहनांची खरेदीविक्री झाली तर त्यांची नोंदणी नंतरही करता येऊ शकते, असे परिवहन विभागाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. त्यामुळे आज गाड्यांच्या शोरूम बाहेर ग्राहकांची झुंबड पाहायला मिळतीये.
काय आहे गाड्यांची बंपर सूट?
कोणत्या गाड्यांवर किती सूट ?
भारत स्टेजचा इतिहास :
टप्पा | साल | युरो टप्प्याशी तुलना | युरोपात कधी लागू झालं
|
बीएस 1 | 2000 | युरो 1 | 1993 |
बीएस 2 | 2001 | युरो 2 | 1996 |
बीएस 3 | 2005 | युरो 3 | 2000 |
बीएस 4 | 1 एप्रिल 2017 | युरो 4 | 2005 |
बीएस 5 | वगळणार | युरो 5 | 2009 |
बीएस 6 | एप्रिल 2020 | युरो 6 | 2014 |