मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /हजारो रुपये घेऊनही वसतिगृहातील जेवणात अळ्या; वर्ध्यात विद्यार्थ्यांवर उपासमारीची वेळ

हजारो रुपये घेऊनही वसतिगृहातील जेवणात अळ्या; वर्ध्यात विद्यार्थ्यांवर उपासमारीची वेळ

(File photo)

(File photo)

Crime in Wardha: वर्धा जिल्ह्यातील सावंगी मेघे येथील एका शाळेच्या वसतिगृहातील जेवणात अळ्या निघाल्याचा (Larvae in meal and breakfast) धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

वर्धा, 11 डिसेंबर: वर्धा (Wardha) जिल्ह्यातील सावंगी मेघे (Sawangi meghe) येथील एका शाळेच्या वसतिगृहातील (hostel mess) जेवणात अळ्या निघाल्याचा (Larvae in meal and breakfast) धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथील वसतिगृहात गेल्या एक महिन्यापासून दररोज जेवणात अळ्या सापडत आहेत. त्यामुळे वसतिगृहातील विद्यार्थ्यांना उपाशी पोटी राहावं लागत आहे. याप्रकरणी मेस व्यवस्थापकाकडे तक्रार केल्यानंतरही कोणतीही कारवाई होत नसल्याने विद्यार्थी संतप्त झाले आहेत.

संबंधित धक्कादायक प्रकार वर्धा जिल्ह्यातील सावंगी मेघे येथील सरस्वती मुलींच्या वसतिगृहात घडला आहे. संबंधित वसतिगृहातील जेवणात आणि नाष्ट्यात गेल्या एक महिन्यापासून अळ्या निघत आहेत. मेस व्यवस्थापनाकडे तक्रार केल्यानंतर देखील कोणतीही कारवाई केली जात नाहीये. विद्यार्थ्यांच्या गैरसोयीकडे जाणूनबुजून कानाडोळा केला जात आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संतापाची भावना आहे.

हेही वाचा-कोल्हापुरात अल्पवयीन विद्यार्थिनीची आत्महत्या; गळफास घेत केला जीवनाचा शेवट

खरंतर, संबंधित वसतिगृहात ANM, GNM, B.Sc आणि फार्मसीचं शिक्षण घेणारे शेकडो विद्यार्थी आहेत. विदर्भातील अनेक विद्यार्थी सावंगी मेघे येथील सरस्वती वसतिगृहात शिक्षण घेण्यासाठी येतात.  संबंधित विद्यार्थ्यांकडून दरमहा 6 हजार 450 रुपये जेवणाचा खर्च होतो. विद्यार्थ्यांकडून हजारो रुपये घेऊनही सोयी सुविधेच्या नावांवर अळ्यांचे जेवण आणि नाष्टा दिला जात आहे. यावर वसतिगृह प्रशासनाकडून कोणतीही कारवाई केली जात नाहीये.

First published:

Tags: Crime news, Wardha